आषाढी वारी :-डोक्यात आणि डोक्यावर कोणाला घ्यायचं ?-संतोष गुरव



मावळ मराठा न्युज :-दि.२९/०६/२४,काल हा भावलेला एक छान क्षण. डोक्यात आणि डोक्यावर कोणाला घ्यायचं याबद्दल सर्वत्र गोंधळच दिसतो.पण वारकरी पऱंपरेत तुम्हाला हा गोंधळ दिसणारच नाही.तिथे वारसाहक्काने मिळते ते पांडुरंगाचे नाम.बालवयापासून ते मनात व देहात रूजवले जाते तो हे क्षण सुस्पष्ट करतो.आजच्या परिस्थितीत हाच वारसा,हीच वारकरी सांप्रदायिक परंपरा तुमच्या आमच्या पुढच्या पिढीला योग्य मार्ग दाखवेल जो शाश्वत सुखाचा असेल. रामकृष्ण हरीछायाचित्र:- माऊली विजय शेवकर




