*संजय गोळपकर संचलित”स्वरतरंग” वाद्यवृंद निर्मित “स्वर्गीय मोहम्मद रफी स्मृतीदिनानिमित्त अजरामर गीतांद्वारे श्रद्धांजली*

मावळ मराठा न्युज-लोणावळा,लोणावळ्यातील महिला मंडळ हॉल येथे संजय गोळपकर संचलित”स्वरतरंग” वाद्यवृंद निर्मित “स्वर्गीय मोहम्मद रफी स्मृतीदिना” निमित्त त्यांच्या अजरामर गीतांद्वारे प्रमुखपाहुणे आणि उपस्थित संगीत प्रेमी यांच्या साक्षीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.स्वर्गीय मोहंमद रफी यांच्या बहारदार गीतं गात कलाकारांनी संगीत प्रेमी रसिकांची मने जिंकली.यावेळी वैद्यकीय क्षेत्रात डॉ मंदा सोमण,डॉ प्रकाश अग्रवाल,राजकीय क्षेत्रात हेमलता अगरवाल, दत्तात्रय येवले, शैक्षणिक क्षेत्रात संजय विधवन्स, पत्रकारिता क्षेत्रात विशाल पाडाळे ऍड संजय पाटील आणि सामाजिक क्षेत्रात प्रकाश पाठारे यांना गौरविण्यात आले.या लाईव्ह संगीताच्या सदाबहार कार्यक्रमात संगीताची साथ अतुल,राकेश,सुनील,गणेश,संजय गोळपकर,विशाखा गोळपकर,प्रज्ञा,राजकुमार गोयल ऍड इलीझाबेथ यांनी साथ दिली तर उत्कृष्ट सूत्रसंचालन सुनील यादव आणि अनुप्रिता यादव यांनी केले.









