‘सूक्ष्म योगा फाउंडेशन’च्या कार्याचा राज्यस्तरीय गौरव ; पंकज अनिल शर्मा यांना ‘आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६’

मावळ मराठा न्युज -पुणे, दि. २६ एप्रिल २०२६:महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार – २०२६ या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात योग क्षेत्रातील उल्लेखनीय व समाजाभिमुख कार्याबद्दल मा. पंकज अनिल शर्मा (संस्थापक – सूक्ष्म योगा फाउंडेशन) यांना सन्मानित करण्यात आले.पुणे येथील निवारा वृद्धाश्रम हॉलमध्ये पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.सुक्श्म योग फाउंडेशनच्या माध्यमातून मा. पंकज शर्मा यांनी योग, ध्यान, प्राणायाम आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कार्य केले आहे. विशेषतः त्यांनी राबविलेल्या ‘योग सेवा अभियान’ या उपक्रमांतर्गत मावळ तालुक्यातील विविध भागांमध्ये ९० दिवसांचे मोफत योग शिबिर आयोजित करण्यात आले. या अभियानामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत योग पोहोचला असून, हजारो नागरिकांना शारीरिक व मानसिक आरोग्याचा लाभ झाला आहे.याशिवाय शाळांमध्ये मोफत योग शिक्षण, महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम, तसेच युवकांमध्ये मानसिक सुदृढतेसाठी कार्यशाळा असे विविध उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने राबविण्यात येत आहेत.पुरस्कार स्वीकारताना मा. पंकज शर्मा म्हणाले,”हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. योग हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे, या ध्येयाने आम्ही काम करत आहोत. ‘योग सेवा अभियान’ सारख्या उपक्रमांद्वारे समाज अधिक निरोगी आणि सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न पुढेही सुरू राहतील.”या सन्मानामुळे सुक्श्म योग फाउंडेशनच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, समाजामध्ये आरोग्य आणि जागरूकतेचा संदेश अधिक व्यापक पद्धतीने पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page