*रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे कैवल्य विद्यानिकेतन येथे आंतर शालेय देशभक्ती वरील गाण्याची स्पर्धा उत्साहात संपन्न*

मावळ मराठा न्युज -लोणावळा,रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे सलग दुसऱ्या वर्षी आपल्यास्वातंत्र्यदिनानिमित्त कैवल्य विद्यानिकेतन, तुंगारली मध्ये अंतर शालेय, देशभक्ती वरील गाण्याची स्पर्धा शुक्रवारी, ८ ऑगस्ट ला आयोजित केली गेली. यात लोणावळ्यातील सात प्रमुख शाळेनी भाग घेतला व जवळजवळ २०० मुलं व मुलीं यामध्ये सहभागी झाले.प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळा पोलीस स्टेशन मधील PSI अनिल केरूरकर तसेच कौवेल्य विद्यानिकेतन चे डायरेक्टर डॉक्टर नारायण दत्त जोशी हजर होते. सर्व शाळेतील संगीत शिक्षक व कैवल्य विद्यानिकेतनच्या प्रिन्सिपल भारती कावडे हजर होत्या. रोटरी क्लब मधून प्रेसिडेंट विजया कल्याण, सेक्रेटरी मुस्तफा कॉन्ट्रॅक्टर, प्रोजेक्ट डायरेक्टर तसनीम बोहरी व क्लब मधील सदस्य हजर होते. या संगीत स्पर्धेचे परीक्षण माननीय चंद्रकांत जोशी व माननीय सुनील कोपरकर यांनी केले. ५ वी ते ६ विद्यार्थी ग्रुप मध्ये, सिंहगड पब्लिक स्कूल प्रथम, आंतर भारती बालग्राम दुसरा व कैवल्य विद्यानिकेतन ने तिसरा क्रमांक पटकावला, तसेच ८ वि ते १० वी विद्यार्थी ग्रुपमध्ये कैवल्य विद्यानिकेतन ने पहिला, गुरुकुल हायस्कूल ने दुसरा व एडवोकेट बापूसाहेब भोंडे स्कूल ने तिसरा क्रमांक पटकावला त्याचप्रमाणे विशेष बक्षीस रायवुड इंटरनॅशनल ला दिले गेले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page