संभाजी ब्रिगेड पुणे शहर पर्वती विधानसभा महिला आघाडी अध्यक्षपदी अर्चना गव्हाणे यांची निवड


मावळ मराठा न्यूज़, पुणे :- संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर महिला आघाडीची बैठक बोलवण्यात आली होती पुणे शहरातील आठ विधानसभा महिला आघाडीच्या इच्छुक महिला अध्यक्षांच्या मुलाखती घेण्यात आल्या बाकीच्या निवडी लवकरच जाहीर करण्यात येतील असे मार्ग अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी सांगितले.तसेच संभाजी ब्रिगेड महिला आघाडी येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरांमध्ये सक्षम झालेली आपल्याला पाहायला मिळून येईल या माध्यमातून अनेक महिलांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल प्रत्येक वार्डानुसार शाखा व महिला गट निर्माण केले जातील असे प्रतिपादन अविनाश मोहिते यांनी केले यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे महानगराध्यक्ष अविनाश मोहिते कार्याध्यक्ष अविनाश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.




