नवीन ३ फौजदारी कायदे संदर्भात ॲड गणेश शिरसाट यांचे वडगांव मावळ कोर्टात व्याख्यान संपन्न

मावळ मराठा न्युज :-वडगांव,वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन वतीने ॲड गणेश शिरसाट यांचे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष संहिता २०२३ , बाबत नुकतेच वडगांव मावळ कोर्टात व्याख्यान संपन्न झाले. त्यावेळी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. फौजदारी वकिली व्यवसाय करताना कोणत्या महत्वाच्या कलमा संदर्भात अभ्यास करणे गरजेचे आहे हे सांगितले. तसेच काही महत्वाचे कलमांमध्ये परिपूर्ण दुरुस्ती राहिलेने भविष्यात रिट पीटिशन त्या संदर्भातील दाखल होऊ शकते असेही सांगितले. तसेच नविन बदलामुळे पोलिसाचे आरोपीचे पोलिस कस्टडी बाबत अधिकार वाढल्याचे देखील सांगितले. तसेच न्यायदानाची प्रक्रिया वेगवान होणार आहे असेही सांगितले. काश्मीर ते कन्याकुमारी व द्वारका ते आसाम एकच न्यायव्यवस्था लागू होईल असेही सांगितले. यावेळी वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन वतीने त्यांचा सत्कार करणेत आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर वकील बंधु भगिनीं उपस्थित होते. यावेळी वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे, ॲड नामदेव दाभाडे, ॲड रंजना भोसले, उपाध्यक्ष ॲड मिनाक्षी ढोरे, सचिव ॲड प्रनोती पिंगळे, ॲड अक्षय रौंधल, ॲड दीपक चौधरी, ॲड धनंजय कोद्रे, ॲड अजित वहीले, ॲड संतोष गुंजाळ, ॲड शामराव ढमाले, ॲड राम शहाणे आदी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page