लोणावळा नगरपरिषद प्रशासन काळाचा लोणावळेकर नागरिकांना बसतोय कोट्यवधी रुपयांचा फटका

मावळ मराठा न्यूज़:- लोणावळा, लोणावळा नगरपरिषद प्रशासन काळाचा लोनवलेकर नागरिकांना बसतोय कोट्यवधी रुपयांचा फटका ,मावळतील वारकऱ्यांची श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पात्रात सांडपाणी जावु नये आणि त्या सांडपाण्यावर प्रक्रिया होवून परत दुबार पानी इतर ठिकाणी वापरता यावे या साठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी साठी लाखो रुपये दरवर्षी लोनवलेकर नागरिकांच्या करातून खर्च केले जातात, पण ते काम योग्य होतेय का ? त्यावर पालिका अधिकाऱ्यांचे कोणाचे ही लक्ष नाही.काम सुरु झाले की दया ठेकेदाराला पैसे,ते काम योग्य आहे का ? त्याने त्यासाठी योग्य दर्जाचा माल वापरला आहे का ? याकडे कोणी पाहताना दिसत नाही . सहा महिन्याचा प्रशासन काळ दीड वर्षांहून अधिक वाढल्याने प्रशासनवर कोणाचेही नियंत्रण नाही त्यामुळे मनमानी कारभार प्रशासनकडून चालु आहे ,नागरिकांच्या तक्रारी कड़े लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ नाही, ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. लोणावळा नगरपरिषद निवडणुका लंबल्याने पालिकेचे तत्कालीन लोक प्रतिनिधि यांनी लोकांच्या समस्या यांचेकडे पाठ फिरवली आहे .निवडणुका आल्या की मग नागरिकांना दाखवायला कहिहि कार्यक्रम आयोजन करतील,आणि तालुक्याचे लोकप्रतिनिधि आपल्या पक्षाचे काय होतेय ? पुढच्या निवडणुकीत तिकीटां च्या खात्रीसाठी आणि काळजीपोटी पक्ष आणि श्रेष्ठि नेते मंडळी यांना खुश करण्यात आपला वेळ घालवत आहेत ,त्यामुळे मतदारकडे पूर्णता दुर्लक्ष होताना दिसत आहेत. लोनावला नगरपालिकेने आठ कोटि ची स्मशान भूमि बांधली याला कुणाचाहि विरोध नाही ,आणि करण्याचे कारणही नाही. पण मावळ वार्ताचे प्रतिनिधि आमचे सहकारी पत्रकार मित्र सुनील चव्हाण यांच्या अंत्यविधि साठी जमलेल्यां नागरिकांना त्या ठिकाणी निदान एक तास तरी बसता आले का ? धूळ, घाण ,आणि कचरा होता त्यामुळे सर्वाना उभेच राहावे लागले , त्याची देखभाल करने जर शक्य नसेल तर त्यावर एवढा ख़र्च करणे किती उचित आहे? हेच आम्ही सांगत आहोत .जिवंत लोकांसाठी सांस्कृतिक भवन बांधा त्यातून लोक कला ,नाटके यांच्या प्रयोगातुन पालिकेला भाड़े रुपात देखभाल करता आली असती,आणि हरवत चाललेला सांस्कृतिक कला जपून तणाव तुन नागतिकांची काही प्रमाणात मुक्तता झाली असती , असो .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page