*लोणावळा येथील कुमार चौक ते नियोजीत स्काय वॉक प्रकल्प या मार्गावरील रायवूड परिसरातील शेकडो वर्ष जुनी झाडे तोडू नयेत – नासिर भाई शेख*








मावळ मराठा न्युज – लोणावळा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे लोणावळा शहर अध्यक्ष आणि लोणावळा नगरपरिषद माजी नगरसेवक, श्री. नासीर शेख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी, पुणे यांना लोणावळा शहराची थंड हवेची असलेली आणि निसर्ग नगरी म्हणून असलेली ओळख तशीच राहावी यासाठी विनाकारण आणि गरज नसताना वृक्ष तोड होऊ नये म्हणून लेखी पत्र देऊन आपली जागरूक नागरिक म्हणून आपली पुढे सरसावले आहेत.लोणावळ्याचा विकास व्हावा यात कुणाचे ही दुमत आणि विरोध असण्याचे कारण नाही परंतु विकासाच्या नावाखाली वृक्ष तोड होऊ नये अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.दिवसेंदिवस लोणावळ्यात निसर्गाचा ऱ्हास होत आहे झाडी कापून मोठ्या प्रमाणावर सिमेंटचे जंगल उभे राहत आहे आणि गेल्या दोन तीन वर्षांपासून उष्णतेचा पारा कधी नाही एवढा वाढताना दिसत आहे.नासिरभाई शेख यांनी लोणावळा नगरपरिषद हद्दीतील कुमार चौक ते नियोजीत स्काय वॉक प्रकल्पाकडे जाणा-या रस्त्याचे रुंदीकरणामध्ये रायवूड परिसरातील शंभर वर्ष जुनी असलेली झाडे संरक्षित ठेवण्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. लोणावळा शहरातील कुमार चौक ते नियोजीत स्काय वॉक प्रकल्प या मार्गावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये रायवूड परिसरातील शेकडो वर्ष जुनी, पर्यावरणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची झाडे तोडण्याची शक्यता आहे. हा परिसर शहरातील सर्वात हिरवागार व जैवविविधतेने समृद्ध आहे.Environment Protection Act १९८६ नुसार पर्यावरणाचे संरक्षण करणे बंधनकारक आहे.Forest Conservation Act १९८० नुसार वृक्षतोडीसाठी परवानगी आवश्यक आहे.Maharashtra Tree Preservation Act १९७५ अंतर्गत झाडे तोडण्यासाठी ट्री अथॉरिटीची मंजुरी आवश्यक आहे.Air and Water Pollution Acts India नुसार प्रदूषण नियंत्रण आवश्यक आहे.Public Trust Doctrine नैसर्गिक साधनसंपत्ती जनतेची आहे, सरकार फक्त ट्रस्टी आहे.या सर्व कायद्याचे उल्लंघन होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. यासाठी प्रशासनाने रायवूड परिसरातील एकही प्रौढ (mature) झाड न तोडता पर्यायी डिझाईन (alignment change) करावा.Detailed Tree Survey Report सार्वजनिक करावी.Environmental Impact Assessment (EIA) करावी.जर झाडे तोडणे अपरिहार्य असेल तरः १ :१० प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे आणि आणि फक्त वृक्षरोपण न करता ती सर्व झाडी जगविण्यात यावी.तसेच Transplantation शक्यताvतपासण्यात यावी आणि शक्य असेल तर Transplantation करण्यात यावे.नागरिकांचा सहभाग घेऊन Public Hearing आयोजित करावी.जर या सर्व कायद्याची आणि इतर दखल घेतली नाही, तर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष National Green Tribunal (NGT) येथे कायदेशीर याचिका दाखल करू असा इशारा नासिर भाई शेख यांनी दिला आहे. याबाबत माहितीकरिता व योग्य त्या कार्यवाहीकरिता मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे,मुख्याधिकारी, लोणावळा नगरपरिषद यांना ही याबाबत पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे..



