आझाद मैदानावरील हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक शिष्टमंडळाला उदय सामंत यांचे आश्वासन

मावळ मराठा न्युज -महाराष्ट्र राज्यातील सर्व हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक यानी पथ विक्रेता ( उपजिवीका रक्षण व संसाधनांचे संरक्षण विनियमन) अधिनियम २०१४ च्या अंमलबजावणी संदर्भात जाणीव हातगाडी फेरी पथारी स्टॉलधारक संघटना पुणे दिलासा जन विकास संस्था पुणे, हाॅकर्स जाॅइंट अक्शन कमिटी महाराष्ट्र राज्याने दिनांक १५/७/२०२५ रोजी महाराष्ट्र सरकाराला विनंती करण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे . आमच्या समस्या सोडवण्यासाठी मा श्री उदय सामंत उद्योग व मराठी भाषा मंत्री यांनी आंदोलन ठिकाणी आम्हाला भेट दिली असता संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.आमच्या संजय शंके, श्वेता ओतारी, सदिप यादव,अभिजित हत्ते,लक्ष्मण माने, मारुती खुटवड, सोबत चर्चा केली असता. सविस्तर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांत मंत्रालयात बैठक घेऊन संघटनेच्या मागण्यांवर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. अशी माहिती जाणीव संघटना पुणेचे कार्यवाह संजय शंके यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page