अहो साहेब गुन्ह्यांकडे लक्ष द्या,माहिती अधिकार वाले त्यांचे काम करतील,तुम्ही तुमचे करा ….


लोणावळा:- लोणावळा शहर परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे त्यात नागरिकांना पोलीस स्टेशनला व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत. नुकतेच रेल्वे विभागातील जिजामाता नगर येथील रहिवाशी यांनी वारंवार चोरीचे गुन्हे घडत असून शहर पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत अशी निवेदन कर्त्यांचे म्हणणे होते. ते अगदी रास्तच आहे. राजकारणी लोकांसारखे बघतो,पाहतो ,ठोकतो बेड्या ,तो गुन्हेगार अज्ञान आहे अशी उत्तर पोलीस अधिकारी देणार असतील तर नागरिकांनी कोणाकडे जावे? हा प्रश्न निर्माण होतो. एक स्थानीक लोकप्रतिनिधी आपल्या विभागातील नागरिक, कार्यकर्ते, पत्रकार यांना अशी उत्तरं मिळत असतील तर बाकी काही बोलायलाच नको.ज्याची माहिती नागरिक तुम्हाला स्वतः हुन देतात त्या गुन्हेगारासम्बधी त्याचा देखील तुम्ही पाठ पुरावा करून अंमलबजावणी करत नसाल तर मग गुन्हेगारांचे फावणारच. नागरिकांचा राजकारण्यांवरील विश्वास सद्यपरिस्थितीत अजिबात राहिलेला नाही, न्यायालय आणि पोलीस हेच नागरिकांसाठी न्याय मिळण्यासाठी आशेचा किरण आहे. मात्र तो ही असे वागायला लागल्यावर सामान्य नागरिकांनी काय करावे? हाच मोठा प्रश्न आहे. असे अनेक गुन्ह्याबद्दल नागरिक स्वतः लोणावळा शहर पोलीस स्टेशन ला सहकार्याची भूमिका घेतात त्यात तुम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करणे अपेक्षित असताना आपण मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसतात अशी लोणावळ्यातील बहुसंख्य नागरिकांची तक्रार आहे. हे योग्य नाही. निवेदनकर्त्याना सांगता तुम्ही निवेदन नका देवू लोकांना वाटेल दबावापोटी पोलिसांनी कारवाई केली. माहिती अधिकारवाले मग परत आम्हाला विचारतील .साहेब माहिती अधिकार वाले त्यांचे काम करतील तुम्ही तुमचे काम चोख करा एवढेच… काही दिवसांपूर्वी एम एन न्यूज चे आमचे प्रतिनिधी रितेश भोमे यांनी देखील स्वतः गुन्हेगाराला एका मतिमंद मुलीचा छेड काढताना तिला त्रास देत असताना आपल्यासमोर पकडुन आणुन दिले त्याबद्दल प्रथम दर्शनी त्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल करायला देखील तुम्ही कुणाची वाट पाहता ? एवढा उशीर गुन्हा दाखल करायला ? त्या मुलीवर अन्याय झाला हे स्पष्ट दिसत असताना तुम्ही बघ्याची भूमिका घेतात हेच मुळात संशयास्पद आहे. याप्रकरणी मी स्वतः ३,४ वेळा येवून गेलो.मला देखील समाधान कारक उत्तर तुमच्याकडे नाही मिळाली. तपास अधिकारी यांना मी पत्रकार म्हणून संपर्क करण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा व्यवस्थित उत्तरे देवू शकत नसतील तर सामान्य माणसाला कशी उत्तर मिळत असतील हे सांगायला नको. आपल्या कामकाजात सुधारणा होईल अशी अपेक्षा.




