दिल्ली येथील रामलीला मैदानावरील २० एप्रिल २०२३ पासून सुरू होणारे आमरण उपोषण देशाला पुन्हा दिशा देणार

मावळ मराठा न्यूज: मुंबई,जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे रामलीला मैदान वर उपोषण केले तेव्हा देशातील भ्रष्ट्राचार दूर व्हावा यासाठी देशात लोकपाल आणि सर्व राज्यात त्या धर्तीवर लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी संपूर्ण देश पेटून उठला होता आणि सर्व स्तरातून अण्णांचा उपोषणाला मोठे यश मिळाले होते.सत्ता पलट झाली. त्याच प्रमाणे उद्या सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाला देखील देश वासियांचा मोठा प्रतिसाद मिळेल कारण यातील मागण्या ह्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या आहेत. देशाची लोकशाही बळकट करणाऱ्या आहेत. यात राष्ट्रीय लोक चळवळचे कार्यकारी अध्यक्षा कल्पना इनामदार आमरण बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. त्यात भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी कमी करणे,एमएसपी अंमलबजावणी,देशाची मालमत्ता विकणे बंद करणे, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक राज्यात सक्षम लोकपाल आणि लोकायुक्त कायदा आणणे, राजकीय पक्षांवर आरटीआय कायद्यांतर्गत कायद्याची अंमलबजावणी,राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन धोरण रद्द करणे (देशाची मालमत्ता विकून वाचवा)महागाई कमी करण्यासाठी ब्रँडेड किंवा पॅकेज्ड या जीवनावश्यक वस्तू वस्तूंवरील जीएसटीचे स्लॅब काढून टाकणे,पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती GST च्या कक्षेत आणून त्यांच्या किमती कमी करणे,केंद्रीय कृषी खर्च आणि किंमती आयोगाला स्वायत्त दर्जा देणे, सर्व कृषी उत्पादनांवर एमएसपी कायदा लागू करणे,शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करणे, K.G. TO P.G. मोफत शिक्षण करणे, समान दर्जाचे, सक्तीच्या शिक्षणासाठी कायदा करणे,बॅलेट पेपरवर लोकसभा निवडणूक घेऊन देशवासीयांना विश्वास देणे,पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करणे, या प्रश्नांवर रस्त्यावर गप्प बसले तर संसदेत बसलेले लोकप्रतिनिधी भटके होतील.सर्व देशवासियांना आंदोलनात सहभागी होण्याचे सरचिटनीस अशोक सब्बन,जगदीशजी सोळंकी, कमलनाथ टॉवरी,सुखदेवसिंग विर्क,प्रा.बालाजी कोंपलवार,योगेंद्र पारीक,दत्तात्रय आवारी,मनोहरकुमार वर्मा,भोपालसिंग यांनी आवाहन केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page