लोणावळ्यात १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा २ जून २०२६ ला गौरव सोहळा







मावळ मराठा न्युज -लोणावळा, श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, लोणावळा आणि नगरसेवक मुबिनभाई इनामदार यांच्या संयुक्त विद्यमाने, १० वी आणि १२ वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम २ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता, चंद्रलोक हॉटेल (गवळी वाडा जवळ, लोणावळा) येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी श्री नितीन अग्रवाल (माजी नगरसेवक आणि संस्थापक अध्यक्ष, श्री सत्यनारायण मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट) आणि नगरसेवक मुबिनभाई इनामदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना या गौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



