विशेष कार्यकारी अधिकारी पदी कामगार बाळासाहेब साळुंके यांची उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते नियुक्ती



मावळ मराठा न्युज:- पुणे,गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांमधून जिल्ह्यातील सहा कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार ही नेमणूक करण्यात आल्याचे गुणवंत कामगार बाळासाहेब साळूंके यांनी सांगितले. यावेळी श्री बाळासाहेब साळुंके, श्री किरण देशमुख, श्री शिवाजी पाटील श्री दत्तात्रय गायकवाड, श्री वसंत कोल्हे श्री दिलीप पासलकर गुणवंत कामगार पुरस्कार २०१९ यांना नेमणुकीचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम तहसीलदार श्री बाळासाहेब शिरसाठ कार्यालयीन कर्मचारी श्री मानव टिळेकर उपस्थित होते.यावेळी डॉ. दिवसे म्हणाले की, देशाच्या राज्याच्या जडणघडणीमध्ये अर्थव्यवस्थेच्या रूपाने उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे राज्याच्या उत्पादनामध्ये पुणे जिल्ह्याचा सुमारे १४ ते १५ टक्के वाटा असून यात वाहन उद्योग उत्पादन आदींचे मोठे योगदान आहे, पर्यायाने अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी गुणवंत कामगाराचे महत्त्वाचे योगदान आहे .




