डोंगरगाव मधील आपत्ती ग्रस्त नागरिकांना केवरे वसाहत येथील जिल्हा परिषद शाळेत सुरक्षित स्थळी स्थलांतर

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,डोंगरगाव मधील आपत्ती ग्रस्त लोकांना केवरे वसाहत येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हलवले आहे त्यांची दुपारच्या जेवणाची व्यवस्था वरसोली येथील जगप्रसिद्ध मनशक्ती केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे. तर संध्याकाळी डोंगरगाव चे ग्रामसेवक,वरसोली मंडळाधिकारी उज्वला पवार,पोलीस पाटील कचरे पाटील, सरपंच सुनील येवले यांच्या सहकार्यातून आपत्तीग्रस्त स्थलांतरित नागरिकांची भोजन व्यवस्था करण्यात आली.त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची काळजी घेण्यात येत आहे. तसेच पंकज भाऊ खोले यास कडुन नाष्टा व चहाची सोय करण्यात आली.अश्याच कुठे आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत हवी असल्यास त्यांना भोजनची व्यवस्था मनशक्ती केंद्राच्या वतीने करण्यात येईल असे प्रमोद भाई शिंदे यांनी मावळ मराठाशी बोलताना सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page