जेष्ट नागरिक संघ,लोणावळाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मृदुला पाटील यांच्या नेतृत्वातील नविन कार्यकारिणीने श्री सत्यनारायण महापूजाने केला आपल्या कार्याचा शुभारंभ








मावळ मराठा न्युज – लोणावळा,नुकताच ज्येष्ठ नागरीक संघ लोणावळाची नविन कार्यकारिणी ने श्री सत्यनारायण महापुजा करून आपल्याकार्याची सूरवात केली.पूजेसाठी माजी अध्यक्ष श्री दिलीप समेळ तसेच माजी अध्यक्ष श्री .सौ. जयश्री अरविंद मेहता. माजी अध्यक्ष पांडूरंग तिखे. श्री बंसल. श्री अरूण जोशी श्री कूमठेकर. आणी सर्व कार्य कारीणी सभासद यांनी हजेरी लावली . सर्वउपस्थित मान्यवरांचे नवनिर्वाचित अध्यक्षा मृदुला पाटील यांनी स्वागत आणि सर्वांचे मनापासून आभार मानले. तसेच यावेळी मागील महिन्यातील आणि आगामी काळातील ५१ सभासदाचे वाढदिवस साजरा करायचे ठरवले आहे. त्याप्रमाणे संध्याकाळी सर्व वाढदिवस असणारे सभासद आणि खूप पाहूणे मंडळी यात माजी नगरध्यक्षा सूरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्री श्रीधर पूजारी. माजी नगरसेवीका सिधु कविश्र्वर, श्री सौ.उमा राजेश मेहता तसेच सौ महिला मंडळाच्या मनिषा बांबोरी तसेच एम .एन न्यूज.चे संपादक ऍड श्री संजय पाटील, सूर साधना चे संचालक आणि मावळवार्ता चे श्री .प्रदिप वाडेकर,श्री बापु तारे, अनेक ज्येष्ठ सभासद,महिला मंडळ अध्यक्षा मेधा वैद्य, तसेच श्री गनी भाई खंडेलवाल यांनी आपल्या साठी बहारदार गाण्याचा कार्यक्रम त्यांच्या सहकलाकारा बरोबर घेऊन केला,आणी उपस्थित मान्यवारांच्या आनंदात भर पाडली तेव्हा त्याचे सर्वाचे अध्यक्षा मृदुला पाटील यांनी मनापासुन आभार मानलेत.



