लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक १८/१२/२०२४ ते २०/१२/२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आले.लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालयात सर्वगोर गरिबांची पाल्य शिकत असतात. त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी कला गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.विविध खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातात. विजयी स्पर्धकांसाठी कार्यक्रमाचा बक्षिस वितरण व विविध गुणदर्शन सोहळा २० डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लायन्स क्लब ऑफ लोणावळा, लिजंड्सचे अध्यक्ष गोरख चौधरी,जेष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष पांडुरंग तिखे,पालकसंघ अध्यक्ष संजय सोंडेकर, क्रीडाप्रमुख देवराम पारीठे,स्नेहसंमेलन प्रमुख अमजदखान बा. पठाण,विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. ऋतुजा पोकळे,विद्यार्थी प्रतिनिधी कु. रोहीत जाधव, मुख्याध्यापक बाळकृष्ण बलकवडे,शिक्षकेतर सुषमा जाधव,सौ,सरोदे मैडम,नल्लाबंदू, लतीब सर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page