वलवन येथील नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह रोखून त्यावर विनापरवाना बांधकाम कारणाऱ्यांवर कारवाईची मागणी

मावळ मराठा न्यूज़ मौजे वलवन येथील सर्व्हे नंबर १३४ /१ ब या प्रकाश रघुनाथ पुरोहित आणि इतर यांच्या मालकीची मिलकत असून त्या जागेची मंडलाधिकारी आणि तलाठी यांनी पाहणी करुन पंचनामा केला असता सदर ठिकाणी संबधित कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी घेतली नसल्याचे आढळून आलेचे दिनांक ५ डिसेम्बर २०२३ रोजी पंचासमक्ष केलेल्या पंचनामा मध्ये आढळून आले आहे. त्यामुळे त्यांचे विनापरवाना सुरु असलेले बांधकाम त्वरित बंद करावे अशी जागृत नागरिक शेखर विष्णुपंत पासलकर , भरत मल्हारी भरने ,भूषण मुरलीधर पालेकर,राजू पांडुरंग बोडके ,हर्षल दत्तात्रय क्षीरसागर ,मनोज मनोहर घारे ,आणि सदानंद नारायण पिलाने यांनी पंचनामा वर सह्या केल्या आहेत .यावर लोनावला नगरपरिषदेने संबधित प्रशासनशी पत्रव्यवहार करुन सदर विनापरवाना सुरु असलेले बांधकाम त्वरित थांबवावे आणि पावसाळ्यात बद्रीविशाल सोसायटी आणि परिसरात होणाऱ्या या ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाह रोखणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी लोनावला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबले यांचेकडे वलवन ग्रामस्थानी केलि आहे .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page