बाळकृष्ण गोविलकर यांच्या”पुंडलिका वरदे हरि विठ्ठल” या अभंग संग्रहाचे प्रकाशन







मावळ मराठा न्युज -लोणावळा, दि.२३ मे वेहेरगाव मावळ येथील ग्रामस्थ व श्री एकविरा देवीचे पुजारी बाळकृष्ण गोविलकर यांनी १९३० सालापासून लिहिलेल्या “पुंडलिका वरदे हरि विठ्ठल” या अभंग संग्रहाचे प्रकाशन नुकतेच संप्पन झाले.एकविरा देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांचे हस्ते या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी विशेष अतिथी म्हणून देवस्थानचे उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, विश्वस्त विकास पडवळ, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे ,संचालक शरद कुटे ,मधुकर पडवळ, वेहेरगावच्या सरपंच अर्चना देवकर, ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड, देवस्थानचे विश्वस्त मारुती देशमुख, सामाजिक कार्यकर्ते योगेश पडवळ साप्ताहिक अंबरचे सहसंपादक प्रशांत पुराणिक, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना हुलावळे यांनी हा अभंग संग्रह समाजाला दिशा देणारा ठरणार असून, यातून बाळकृष्ण गोविलकर यांची विठ्ठल भक्ती दिसून येते. त्यांचे अखंड चिंतन व भावभक्ती यामुळे हे अभंग खऱ्या अर्थाने वाचनीय आहे ते म्हणाले. प्रशांत पुराणिक यांनी बोलताना या अभंग संग्रहात गोविलकर यांच्या मनातील भक्ती व शब्दचांदणे चौफेर पसरले असल्याचे दिसून येते असे सांगितले. वयाच्या ९८ व्या वर्षीही त्यांची प्रतिभा उत्कट असल्याचे ते म्हणाले. . नवनाथ देशमुख यांनी हा संग्रह म्हणजे एक प्रसाद असल्याचे सांगून गोविलकर यांनी खऱ्या अर्थाने श्रीविठ्ठल पूजा बांधली असल्याचे नमूद केले,. ( बाळकृष्ण गोविलकर यांनी चार तपे . श्री एकविरा देवीची पहाट पूजा केली असून आता त्यांचे पुत्र संजय हा वारसा चालवित आहेत) प्रास्ताविक संजय गोविलकर यांनी केले, सूत्रसंचालन भास्कर बोकील व पूजा कोटस्थाने यांनी केले,.जयंत गोविलकर व. स्नेहीजनानी संयोजन केले. यावेळी, वेहेरगाव ग्रामस्थ, गोविलकर कुटुंबीय व आप्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.



