अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण जनआक्रोश महाआंदोलनात शिवशाही व्यापारी संघ ताकदीने सहभाग घेणार-लोकसेवक युवराज दाखले.

मावळ मराठा न्युज -पिंपरी -प्रतिनीधी, मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून २०२५ पासून लागू करण्यात आली दिनांक २० मे २०२५ रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत आजाद मैदान मुंबई या ठिकाणी घेण्यात आलेल्या महाआंदोलनात शिवशाही व्यापारी संघ राज्यव्यापी संघटना मोठ्या ताकदीनिशी उतरणार असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी केले आहे सीझन बँकेट हाल दुर्गा नगर निगडी या ठिकाणी सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये दाखले बोलत होते.दरम्यान शिवशाही व्यापारी संघ व सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहरात मा अध्यक्ष डी खंडाळे, रामदास कांबळे, जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोधडी बैठकीच्या माध्यमातून बैठका चालु करू शहरातुन जवळपास दहा हजार समाज बांधव महाआंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दाखले म्हणाले.यावेळी विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरके ,आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती सदस्य अशोकराव लोखंडे ,भास्करराव नेटके, मार्गदर्शक मनोज दादा तोरडमल,पुणे जिल्हा शहर मातंग समाज मा.सचिव अनिल दादा हातागळे, मा नगरसेविका अनुराधा ताई गोरके, कमलताई घोलप, जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अनिल सौंदडे,आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व मा अध्यक्ष संजय धुतडमल,सा.लो डॉ अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष नितीन घोलप, आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहूजी साळवे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष बाबासाहेब पाटोळे,माजी अध्यक्ष,युवक मार्गदर्शक नाना कसबे, संजय ससाणे मा अध्यक्ष तथा शिवसेना युवासेना उपजिल्हा प्रमुख अरुणजी जोगदंड,मा.अध्यक्ष सुनीलजी भिसे,मा अध्यक्ष भगवानजी शिंदे ,मा अध्यक्ष आण्णासाहेब कसबे, प्राध्यापक डॉ.धनंजय भिसेसर, ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे ,शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेशजी डाखोरे,शिवशाही वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अनिलजी तांबे ,मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा साबळे, महिला आघाडी अध्यक्ष भारतीताई चांदणे, शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, उपाध्यक्ष विक्रम गायकवाड,मयुर गायकवाड, बाळासाहेब शिंदे,दिपक चखाले, लहुजी शक्ती सेना युवक आघाडी अध्यक्ष अक्षय पौळ,राजु आवळे,पै विठ्ठल शिंदे, विठ्ठल कळसे, शिवाजीराव साळवे, अविनाश शिंदे, शंकर खवळे, पत्रकार भिमराव बरगडे, कोमलताई शिंदे, जेष्ठ नेते भगवान वैरागकर, बापुसाहेब वाघमारे यांच्या सह शेकडो प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीचे आयोजन समाज बांधव मारूती जाधव, अमोल कुचेकर, जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे , अविनाश शिंदे आदींनी केले होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page