महाराष्ट्र शासन तर्फे मावळ तालुका येथे कायमस्वरुपी उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरु करावे-वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

मावळ मराठा न्यूज -वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे वतीने महाराष्ट्र शासन तर्फे मावळ चे तहसिलदार विक्रम देशमुख सो यांना मावळ तालुका येथे कायमस्वरुपी उपविभागीय अधिकारी मावळ कार्यालयं कायम स्वरुपी सुरु करावे असे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनामध्ये तालुक्यामधून दोन महामार्ग जात आहे. तसेच एम आय डी सी,रिंग रोड, अंद्रा धरण, पवना धरण व इतर धरणे, तसेच महसुली प्रकरणे, आर टी एस अपिले मां. उपविभागीय अधिकारी सो यांचे अखत्यारीत येतात. मावळ येथिल नागरिकांना जवळजवळ 67 किमी प्रवास करून बावधन औंध पुणे येथे जावे लागते. त्यासाठी खुप मोठा खर्च व वेळ वाया जातो. सदर ठिकाणी जाण्यास पुरेशी वाहन व्यवस्था नाही. पक्षकार, नागरिक, वकील यांचा एका कामासाठी पूर्ण दिवस जातो. इ मागण्या सदर निवेदनामध्ये संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. सदर निवेदन प्रती मावळचे आमदार मां.श्री सुनीलअण्णा शेळकेसो, मां.महसूलमंत्री सो, मां. जिल्हाधिकारी सो पुणे याना देखिल पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी वडगांव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स संघटनेचे अध्यक्ष अँड. सोमनाथ पवळे, सचिव ॲड अक्षय रौंधळ ॲड धनंजय कोद्रे, ॲड. अक्षय लोखंडे आदी वकीलवर्ग उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page