कमी वयात साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या वतीने लोणावळ्यातील मृण्मयी काळे सन्मानित










मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्यातील एकदम लहान वयातील कवियत्री आणि ऑक्सिलीयम शाळेत शिकत असलेली मृन्मयी गणेश काळे हिला नुकताच लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चापुरस्कार प्राप्त झाला. दिनांक १४/५/२०२६ रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह,येरवडा,येथे डॉक्टर अविनाश सुकंडे इंटरनॅशनल चेअरमन इंडिया यांच्या हस्ते कमी वयात साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी एमआयटी स्कूलचे डायरेक्टर महेश थोरवे सरांच्या हस्ते लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड च्या वतीने मृण्मयी काळे हिस सन्मानित करण्यात आले. मृण्मयी काळे हिला आता पर्यन्त अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.काव्य संमेलन काव्य स्पर्धा अश्या साहित्य क्षेत्रातील अनेक कार्यक्रमात ही चिमुकली सहभाग घेत असते.



