स्थानिक गुन्हे शाखेची उत्तम कामगिरी,सराईत मोबाईल चोराला स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी घेतले ताब्यात

मावळ मराठा न्यूज़ , लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्याने देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक फिरण्यासाठी येतात.अशा पर्यटनाच्या ठिकाणी मोबाईल चोरीचे प्रमाण खूप वाढले होते.याचे गांभीर्य लक्षात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी लोणावळा विभागात काम करणारे LCB टिमला सुचना व मार्गदर्शन केले.त्यानुसार टिमने तांत्रीक विश्लेशन व गोपणीय माहीती काढून समांतर तपासास सुरुवात केली.मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे टिमने सापळा रचुन आकाश भरत धोत्रे वय २१ वर्षे रा वळकाई वाडी, कुसगाव, लोणावळा,पुणे. यास ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेवून चौकशी केली असता लोणावळा भागात मोबाईल चोरी करत असल्याचे कबूल केले. त्याचेकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून आणखी मोबाईल चोरीची गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशन करत आहे.सदरची कामगिरी ही अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, तसेच मितेश घट्टे ,अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग ,सत्यसाई कार्तीक सो (IPS) उपविभागीय अधिकारी लोणावळा विभाग ,पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा , पोलिस निरीक्षक सिताराम डुबल लोणावळा शहर, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखालीसपोनी नेताजी गंधारे,सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश वाघमारे,पोहवा.राजु मोमीन, पोहवा अतुल डेरे , पोकाॅ प्राण येवले, सहा फौजदार कदम, पोहवा संदीप मानकरपोहवा शिंदे,पोना मुलाणी,यांचे पथकाने सदर कामगिरी केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page