ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व पालक मार्गदर्शन मेळाव्याला प्रचंड प्रतिसादइयत्ता ११वी कला,विज्ञान,वाणिज्य शाखेचे वर्ग सुरू




मावळ मराठा न्युज:-लोणावळा,लोणावळा येथील ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले या मेळाव्याला विद्यार्थी पालक यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.इयत्ता दहावी नंतर विद्यार्थी व पालकांना येणाऱ्या अडचणी व पुढील प्रवेशाबाबत असलेली द्विधा मनस्थीती याबाबत या मेळाव्यात तज्ञांकडून विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता ॲड बापूसाहेब हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नव्यानेच इयत्ता ११वीचे विज्ञान( Science ) वाणिज्य (Commerce ) व कला (Arts) या वर्गांची सुरूवात करण्यात येत आहे त्याच बरोबर JEE NEET CET व MPSC UPSC अशा विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे यासाठी अनुभवी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे विद्या निकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव सौ. राधिका भोंडे यांनी सांगितले. लोणावळा व परीसरातील विद्यार्थ्यांना सदर प्रवेश परीक्षा व स्पर्धा परीक्षांसाठी पुणे मुंबई या मोठ्या शहरात जावे लागत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा व वेळ वाया जात आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून संस्थेचे अध्यक्ष ॲड माधवराव भोंडे व संचालक मंडळाने लोणावळा शहरात कनिष्ठ विद्यालयासह सदर प्रवेश परीक्षा व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे माफक शुल्क आकारून विद्यार्थ्यांना याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. दि. १०जून पासून प्रवेश परीक्षांचे ब्रिज कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत दि. १८ जून पासून इयत्ता ११ वीचे वर्ग सुरू होणार आहेत.प्राध्यापक योगेश चोरगे ,प्राध्यापक संदीप गवळी,प्राध्यापक सुशांत सावंत, प्राध्यापक राकेश गुरव यांनी विद्यार्थ्यांसह पालकांना विविध परीक्षांबाबत मार्गदर्शन करून आम्ही देखील गरीब, होतकरू,शेतकरी कुटुंबातुन आलो असल्याने भोंडे हायस्कुल ने केलेला हा उपक्रम म्हणजे परिसरातील विद्यार्थ्यांना पर्वणीच ठरणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांचेकडून करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिव सौ.राधिका भोंडे ,संचालक मिलिंद खळदकर ,संजीव खळदकर ,संजीव वीर,डॉ संजय पुजारी,माध्यामिक विभागाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते ,पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजूम शेख, माध्यामिक विभागाच्या उपमुख्यध्यापिका तृप्ती गव्हले ,प्राथमिक विभागाच्या उपमुख्यध्यापिका स्मिता इंगळे ,पर्यवेक्षिका स्मिता वेदपाठक, शशिकला तिकोणे यांसह विद्यार्थी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




