शंकरबन प्रतिष्ठान कडून होतकरू गरीब मुलांना मदतीचा हात



मावळ मराठा न्युज:- लोणावळा,लोणावळा शहरात नामवंत व अव्वल दर्जाचे वक्ते, गायक, कीर्तनकर, प्रवचनकार यांना पाचरण करून लोणावळा शहरात दर्जेदार सामाजिक व अध्यात्मिक कार्यक्रम राबविणारी संस्था म्हणून नावारूपास आलेल्या शंकरबन प्रतिष्ठान कडून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. प्रतिष्ठान कडून दरवर्षी सुमित्रा सभागृह, भांगरवाडी, लोणावळा येथे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगटदिन सोहळा उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो व या सोहळ्यात नामवंत गायक, कीर्तनकर यांना बोलावून दर्जेदार कार्यक्रम सादर होतात. तसेच या सोहळ्या नंतर वर्षभर वैद्यकीय मदत, अनाथाश्रम , वृद्धाश्रम येथे सेवा केली जाते. प्रतिष्ठान कडून शिवजयंती, आंबेडकर जयंती निमित्त पेयजल वाटप, वृक्षारोपण, पुणे जिल्ह्यातील अंध महिलांना सॅनिटरी नॅपकिन पुरवठा, अध्यात्मिक ग्रंथ भेट यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. विशेष बाब म्हणजे प्रतिष्ठान कडून प्रगटदिन सोहळ्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा केली जातं नाही. प्रतिष्ठान चे वार्षिक सभासद यांच्या कडूनच निधी गोळा केला जातो. व त्यातून सामाजिक व अध्यात्मिक कार्यक्रम राबविले जातात. प्रतिष्ठान कडून सामाजिक बांधिलकी जपत पुरंदरे हायस्कूल लोणावळा येथे शिकत असलेल्या आई वडील दोघांचे छत्र हरपलेल्या दोन गरीब होतकरू विद्यार्थ्यांची शालेय फी भरून त्यांना पुढील शिक्षणा साठी मदतीचा हात दिला आहे. याप्रसंगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री मनोहर (राजू दादा ) निकम, सचिव अनंता टेमघरे, विश्वस्त प्रभाकर भालेकर, सौ जान्हवी अमोल कसबेकर, तसेच कोअर कमिटी सदस्य श्रीकांत घोडके, विशाल जाधव, धर्मेंद्र डुंबरे, राजाराम बिरांजे, गणेश धामणस्कर, संतोष दाभाडे हे उपस्थित होते. या वेळी प्रतिष्ठान चे अध्यक्ष मनोहर निकम म्हणाले की, समाजातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांना शिक्षणा साठी प्रेरित करणं हे आपल्या सर्वांचं कामं आहे. अध्यात्मिक कार्याबरोबरचं सामाजिक उपक्रम राबविणे आवश्यक असून यापुढील काळात लोणावळा व परिसरातील गरीब होत होतकरू विद्यार्थ्यांसाठी शंकरबन प्रतिष्ठान च्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना चालू करणार असल्याचे प्रतिपादन केले.




