लम्पी साथीवर प्रभावी शासन यंत्रणा राबवली नाहीतर आंदोलन करु-बाळासाहेब रास्ते (प्रदेश अध्यक्ष बळीराजा पार्टी)
सध्या सांगली जिल्ह्यामध्ये लम्पी या साथीच्या आजाराने प्रचंड थैमान घातले असुन जिल्ह्यातील पशुसंवर्धन खात्याकडील यंत्रणा ही कमी कर्मचारी वऔषधांचा कृत्रिम तुटवडा यामुळे कमी पडत आहे व यामुळे अनेक जनावरांना वेळेत उपचार भेटत नसल्यामुळे जनावरे ही प्रचंड प्रमाणात दगावत आहेत. या व
र तात्काळ उपाय योजना करण्यात यावी व जिल्ह्यातील पशुधन वाचवावे अशी विनंती बळीराजा पार्टीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले या वेळी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब रास्ते यांच्या नेतृत्वातील आज शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली या वेळी सांगली जिल्हाअध्यक्ष शशिकांत भाऊ डांगे बळीराजा कामगारअघाडी अध्यक्ष मनोहर रास्ते बाबा पाटणे,उपस्थित होते.




