मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील Missing Link प्रकल्प म्हणजे लोणावळ्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडणारा ; सर्वपक्षीय एकजुटीची गरज – नासिर भाई शेख






मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्याच्या भविष्यासाठी आता एकत्र येण्याची वेळ आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील Missing Link प्रकल्पामुळे लोणावळ्यासाठी अधिकृत Exit उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याचा थेट फटका येथील हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानदार, छोटे व्यावसायिक, टॅक्सी चालक,रिक्षा चालक आणि हजारो कुटुंबांच्या रोजगारावर होत आहे.हा केवळ राजकीय विषय नाही, तर लोणावळ्याच्या अर्थव्यवस्थेचा आणि भविष्यातील विकासाचा प्रश्न आहे.म्हणून सर्व राजकीय पक्ष, व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, जागरूक नागरिक,पत्रकार आणि सर्व लोणावळेकरांनी एकत्र येऊन MSRDC कडे लोणावळ्यासाठी तात्काळ अधिकृत Exit सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन द्यावे.जर MSRDC कडून सकारात्मक निर्णय झाला नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्याची तयारी आपण सर्वांनी ठेवली पाहिजे.लोणावळ्याच्या हितासाठी एकजूट करूया! आणि अधिकृत एक्सिट मिळवू या तरच लोणावळा आणि परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अन्यथा कोलमडून पडेल अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक नासीर शेख यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना व्यक्त केली.



