*‘माँ तुझे सलाम’मध्ये चिमुकल्यांनी जागविला देशभक्तीचा जाज्वल्य भाव; स्वातंत्र्य दिनानिमित्त बालगोपालांनी रसिकांना केले मंत्रमुग्ध*

मावळ मराठा न्युज- लोणावळा,स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा आणि सूर साधना गायन क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘माँ तुझे सलाम’ या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात चिमुकल्या गायकांनी आपल्या सुरेल आवाजातून उपस्थितांच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली. बालगोपालांच्या दमदार आणि भावपूर्ण सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.लोणावळ्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. लहान मुलांच्या मनात देशभक्तीची भावना रुजावी, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्सव अधिक संस्मरणीय व्हावा, या उद्देशाने दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी ‘चिमुकल्या जवानांसाठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. सूर साधनाचे संचालक प्रदीप वाडेकर यांच्या संकल्पनेतून आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहकार्याने हा उपक्रम साकारण्यात आला. यंदा ५ ते १२ वर्षे वयोगटातील अनेक बालकलाकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक धीरूभाई कल्याणजी, अरविंदभाई मेहता, लायन्स क्लब सुप्रिमोच्या अध्यक्षा रंजना पुट्टोल, सुनील लोहर, पुष्पा भोकसे, अमीन वाडीवाल, विश्वनाथ पुट्टोल, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा मृदुला पाटील, रवींद्र कुलकर्णी, प्रतीक्षा महाडिक, शारदा अगरवाल, मंगला राणे आणि दिलीप पवार यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकारिणी सदस्य, पालक, आजी-आजोबा आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.देशभक्तीपर गीतांनी रंगला कार्यक्रम‘माँ तुझे सलाम’ या कार्यक्रमात अनय कुलदीप मळेकर याने ‘नन्हा मुन्ना राही हूँ’, कैवल्य नितीन सातपुते याने ‘जय जय महाराष्ट्र माझा’, कार्तिक विशाल दंडगी याने ‘सारे जहाँ से अच्छा’, अंशिका रोहन वर्तक हिने ‘इंडिया वाले’, मनाली रोहन वर्तक हिने ‘ऐ वतन ऐ वतन’, समर्थ विशाल दंडगी याने ‘जय जय महाराष्ट्र माझा’, वेदिका प्रसाद दंडगी हिने ‘मिट्टी में मिल जावा’, नेहांत नितीन निकम याने ‘ऐ वतन ऐ वतन’, मिष्टु निलेश निकम हिने ‘ट्राय कलर ऑफ इंडिया’, श्लोक वैभव चव्हाण याने ‘ट्राय कलर ऑफ इंडिया’, आराध्य अभिजीत पाटील याने ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’, निर्वी किरण बोराडे हिने ‘हम होंगे कामयाब’ आणि पारस प्रफुल्ल बोराडे याने ‘ओ देश मेरे’ ही गीते सादर केली.याशिवाय विराज चेतन आंबेकर, आयुषी आलोक पाटील, वेदांत सुधीर गोरेगांवकर, शिवम मनोज कदम, विहान सागर भोकसे, अनिका प्रकाश कारके, स्मित ओंकार राणे, देवांश अनिल लाड, वंश अतुल लाड आणि श्रद्धा दिनेश डांगे यांनीही देशभक्तीपर गीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.बालकलाकारांनी सादर केलेल्या प्रत्येक गीताला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. चिमुकल्यांच्या आवाजातून उमटणाऱ्या ‘भारत माता की जय’ आणि देशप्रेमाच्या भावनेने संपूर्ण वातावरण भारावून गेले.बालकलाकारांचा गौरवकार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व बालकलाकारांना लायन्स क्लब ऑफ सुप्रिमो यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच भाजपा नाणे मंडळ लोणावळ्याचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या वतीने मुलांना प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. उपस्थित बालकलाकार आणि त्यांच्या पालकांसाठी खाऊ व नाश्त्याची व्यवस्था ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आली.कार्यक्रमाचे संयोजन सुनील पानंगावकर यांनी केले, तर सूर साधना गायन क्लासेसचे संचालक प्रदीप वाडेकर यांनी प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमात रंगत आणली.चिमुकल्या कलाकारांच्या सुरेल आवाजातून उमटलेला देशप्रेमाचा संदेश आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने ‘माँ तुझे सलाम’ हा कार्यक्रम लोणावळ्यातील स्वातंत्र्यदिन सोहळ्याची एक अविस्मरणीय आठवण ठरला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page