माझी वसुंधरा “स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी” लोणावला नागरपरिषदेत स्वाक्षरी अभियानने सुरुवात



मावळ मराठा न्यूज़ :-लोणावला, केंद्र सरकारचे सुचनेनुसार व माझी वसुंधरा “स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी” अभियानाची सुरुवात लोणावळा नगरपरिषदेने दिनांक ६/११/२०२३ सुरुवात केलेली आहे. या मोहीमेत स्वाक्षरी अभियान राबविणेत आले. लोणावळा नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडीत पाटील, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्षा श्रीधर पुजारी,माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी श्री.कल्याण हुलगे, उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी व नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी सर्वानी ही दिवाळी प्लास्टीकमुक्त, प्रदुषणमुक्त, फटाकेमुक्त बाबतची प्रतिज्ञा घेतली तसेच स्वच्छ भारत अभियान (ना) २ .० अंतर्गत ६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत “स्वच्छ दिवाळी – शुभ दिवाळी” अभियान राबविण्यात येत आहे. लोणावळा शहरातील सर्व नागरिकांना सदर अभियानमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदर अभियानाचे पुढील प्रमाणे दोन घटकांचा समावेश आहे. स्वच्छ दिवाळी स्वाक्षरी मोहिम.स्वच्छ दिवाळी व्हिडिओ रिल. उपरोक्त अभियानाचे पुढील प्रमाणे निकष आहेत.पर्यावरणपूरक स्थानिक उत्पादनांचा वापर करणे.एकेरी प्लास्टिकचा वापर टाळणे.टाकावू पासून टिकावू वस्तू तयार करणे ३ आर (Reuse, Reduce, Recycle )प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना करणे. पर्यावरणपूरक फाटक्याचा वापर करणे. स्वच्छ दिवाळी स्वाक्षरी मोहिम. सदर मोहिमेत सहभाग घेण्यासाठी MyGOV पोर्टलवर स्वच्छ दिवाळीची शपथ घेऊन वैयक्तिक प्रमाणपत्र प्राप्त होते. प्रमाणपत्र लिंक https://pledge.mygov.in/swachh-diwali-shubh-diwali/ स्वच्छ दिवाळी व्हिडिओ रिल. नागरिकांनी दिवाळी साजरी करतांना स्वच्छ पर्यावरणपुरक तसेच सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळून दिवाळी साजरी करतांना वापरलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे छायाचित्र / ३० सेंकदांचा व्हिडीओ सोशल मीडिया वरती #SwachhDiwali टाकून अपलोड करावा व नगरपंचायत फेसबुक. https://www.facebook.com/SwachhLonavla?mibextid=9R9pXO ला टॅग करावा. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ दिवाळी ची ऑनलाईन शपथ घ्यावी व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करणेबाबतचे आवाहन मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक पंडीत पाटील यांनी सर्वाना केले.




