अध्यात्मिक व्यासपीठावर पोहोचला सायबर सुरक्षेचा संदेश;ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती

मावळ मराठा न्युज -जळगाव,अध्यात्मिक वातावरणासोबत डिजिटल सुरक्षेची जोड देत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, जळगाव येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सोमनाथ वडनेर यांच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमाला मीनाक्षी दीदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.Quick Heal Foundation च्या Cyber Warrior उपक्रमातील Sakshi Patil, Vidya Sonawane, Akshay Patil आणि Lokesh Patil यांनी उपस्थितांना ऑनलाइन फसवणूक, OTP, Phishing, Fake Links, Password Security आणि Social Media Safety याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमादरम्यान काही उपस्थितांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवांबाबत आणि यापूर्वी त्यांच्यासोबत घडलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांबाबत प्रश्न विचारले. Cyber Warriors यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून अशा परिस्थितीत कोणती पावले उचलावीत, कोणती खबरदारी घ्यावी आणि भविष्यात अशा फसवणुकीपासून कसे सुरक्षित राहावे, याबाबत मार्गदर्शन केले.विशेषतः ज्येष्ठ व मोठ्या नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहण्याचे आणि OTP, PIN, पासवर्ड किंवा बँकिंग माहिती कोणालाही न देण्याचे आवाहन करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page