२९ जुलै २०२६ ला स्वप्नसिद्धी गणपती मंदिर आणि श्री स्वामी समर्थ मठ,मळवली येथे होणार भव्य गुरु पौर्णिमा उत्सव

मावळ मराठा न्युज – मळवली,येत्या बुधवारी दिनांक २९ जुलै २०२६ रोजी स्वप्नसुती गणपती मंदिर आणि श्री स्वामी समर्थ मठ मळवली येथे अत्यंत उत्साहात गुरु पौर्णिमेचा उत्सव साजरा होणार आहे, परमगुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी आपली सेवा अर्पण करणार आहोत या दिवशीच्या कार्यक्रमाचे स्वरूप खालील प्रकारे आहे. माझे सर्व वकील बंधू भगिनींना विनंती आहे की हा उपक्रम आणि स्वामींच्या दर्शनासाठी नक्की मठाला भेट द्या आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी वेळात वेळ काढून नक्की या आणि या स्वामी सेवेमध्ये भाग घ्या,गुरुर्ब्रम्हा गुरुविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः गुरुलाइफ नॉलेज फाउंडेशन, पाटण (मळवली) तर्फे सर्व स्वामी सेवेकरी यांना सस्नेह निमंत्रण. स्वप्नसिद्धी गणपती मंदिर आणि श्री स्वामी समर्थ मठ, मळवली येथेबुधवार दिनांक २९ जुलै २०२६ रोजी होत आहे
भव्य दिव्य गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रमाचे स्वरूप
सकाळी ७ .३० वाजता स्वामी सहस्त्रनाम जाप आणि अभिषेक
सकाळी ९ ते १० श्रीपाद श्रीवल्लभ गुरुचरित्र पारायण सांगता( पठण आणि श्रवण) सकाळी ११.३० ते १२.३० व्याधी निवारण पाठ पठण “भव्य दिव्य मध्यान्ह गणेश आणि दत्तगुरु आणि स्वामी आरती”
दुपारी १२ ते आपल्या आगमनापर्यंत आपल्या श्री स्वामी समर्थ मठातील महाअभिषेक पाहायला आणि स्वामीसेवेचा लाभ घ्यायला नक्की या.
ठिकाण: स्वप्नसिद्धी गणपती मंदिर, श्री स्वामी समर्थ मठ मळवली, रामुगडे सहनिवास सोसायटी , रोड नंबर ५ इंद्रायणी नदी जवळ. मळवली पाटण येथे येण्याचे आवाहन आयोजकांनी मावळ मराठा न्युज च्या माध्यमातून केले आहे.
स्वामींच्या इच्छेने आणि सामर्थ्याने मौजे पाटण (मळवली) तालुका-लोणावळा जिल्हा-पुणे येथील डॉ.महेश रामुगडे यांनी ॲड.सीमा शर्मा यांना सुपूर्त केलेल्या जागेत रामुगडे सहनिवास हौसिंग सोसायटी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर असलेल्या सुंदर अश्या स्वप्नसिद्धी गणपती मंदिराच्या तळमजल्यावर ‘श्री स्वामी समर्थ’ मठाची स्थापना १६ फेब्रुवारी २०२५ ला करण्यात आली. त्यानंतर दिनांक २२ मार्च २०२५ रोजी तिथे ह्या मठाच्या संस्थापक ॲड सीमा जाधव-शर्मा ( दिया मार्तंड ) यांना श्री स्वामींनी दिलेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनातून ‘शिवशक्ती’ स्वरूपातील खूप सुंदर अशी आईस्वरूप स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ह्या मठात आलेल्या अनेक स्वामी सेवेकरींना स्वामींच्या अगाध लीलांची प्रचिती आली आहे. ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी’ या तारक मंत्रांचा अनुभव अनेक स्वामी सेवेकरी अनुभवत आहेत.अनेक महिलाना या मठाच्या माध्यमातून आईचा, माहेरचा आधार मिळत आहे.स्वामींच्या इच्छेने आणि सामर्थ्याने सुरू झालेला महिला स्वामी सेवेकरी ॲड.सीमा शर्मा( दिया मार्तंड) यांचा श्री स्वामी समर्थ मठ मळवली लोणावळा येथे ह्या मठाची आणि मी जे वकील म्हणुन कौटुंबिक समस्या निवारण करत आहे या कार्याचा अधिकाधिक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ मठ मळवलीच्या ॲड.सीमा शर्मा( दिया मार्तंड) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page