आमदार सुनील शेळके यांचा रोजगार निर्मिती करणारा, पर्यटन नगरीचा काया पालट करणारा प्रकल्पाला मोठा निधी,लोणावळेकर नागरिकांच्या वतीने उद्या जंगी स्वागत


मावळ मराठा न्युज,लोणावळा :-गेली अनेक वर्षे लोणावळ्याच्या सर्वांगीण विकासास अत्यावश्यक असणारा व पर्यटनास प्रचंड मोठया प्रमाणात चालना देणारा व देश, विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारा एकमेव आणि महत्वकांक्षी प्रकल्प ३३३ कोटी ५६ लक्ष रकमेचा स्कायवॉक प्रकल्प टायगर व लायन्स पॉईन्ट, साकुर पठार येथे मंजुर करून घेतला. व त्याच बरोबर लोणावळा शहरासाठी अनेक वर्ष प्रलंबित आणि लोणावळा कर यांचा जिव्हाळाचा आणि अत्यावश्यक असणारा प्रश्न म्हणजे रुग्णालय ,पोलीस स्टेशन ,महसूल कार्यालय ,तसेच रस्ते ,आकर्षक पथदिवे,आणि इतर कामाकरिता एकूण अंदाजे १०० कोटीहुन अधिक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांचा भव्य स्वागत व नागरी सन्मान समारंभ शनिवार दि.१६/१२/२०२३ रोजी सकाळी १०-०० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात येणार आहे .आमदार शेळके यांचे स्वागत करण्यासाठी कुमार रिसॉर्ट चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक बाईक रॅली काढण्यात येणार आहे. असे आमदार श्री सुनिल आण्णा शेळके मित्र परिवार लोणावळा यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.




