बहिणाबाईंना जगण्याचं जे तत्वज्ञान कळलं, ते महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ना नाही उमगलं – सविता इंगळे

मावळ मराठा न्युजनेटवर्क -निसर्ग कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या काव्यातून समाजातल्या स्त्रियांना प्रबोधन केलं. कधीही शाळेत न गेलेल्या निरक्षर असलेल्या बहिणाबाई चौधरी या अंधश्रद्धेवर निर्भीडपणे बोलतात, त्या आपल्या कवितेत म्हणतात, “नको नको ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊमाझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू” जे जगण्याचं तत्त्वज्ञान बहिणाबाईंना समजलं, ते आजच्या विज्ञान युगातल्या स्त्रीला अजूनही नाही उमगलं, नुकताच भोंदू बाबाच्या आहारी गेलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर हे प्रकरण खूप लाजिरवाणं आहे. ज्या महिलेने, इतर महिलांना न्याय मिळवून द्यायचा, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं, पण त्याच जर अशा प्रकारच्या अंधश्रद्धेच्या आहारी जात असतील तर समाजासाठी ते खूप घातक आहे. महिलांचं प्रतिनिधित्व करणारी महिला जर अशा प्रकारची कृत्य करत असतील तर, इतर महिलांना न्याय कसा मिळवूनइतर महिलांना न्याय कसा मिळवून देतील आणि स्त्री शिक्षणाचा काय उपयोग. असे मत इनरव्हील पिंपरी क्लबच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी मांडलेजागतिक महिला दिनानिमित्ताने, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, थेरगाव, पुणे या शाळेमध्ये पालक व शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, प्रबोधन करताना त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, स्त्रिया या मल्टीटास्किंग असतात. त्या एकाच वेळी अनेक काम करू शकतात. तेवढे त्यांच्यामध्ये सामर्थ आहे. त्यांनी कुठल्याही आमिषाला, अंधश्रद्धेला बळी पडू नये.. जागतिक महिला दिनाचा इतिहास हा कष्टकरी कामकरी स्त्रियांनी घडवलेला आहे. आज स्त्रियांनी विविध क्षेत्रात काम करत आहेत. स्त्रियांनी स्वतःच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवावा. व वैज्ञानिक दृष्टिकोन व स्त्री शिक्षणाच्या बळावर स्वतःला सिद्ध करावे.विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, लेखनिक नलिनी पंडित, सुनिता घोडे,अंजली सुमंत, सारिका देसाई, योगेश्वरी जाधव सहशिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले. मनिषा समर्थ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनीही “अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. चांगले शिक्षण घ्या व स्वतःच्या पायावर उभे रहा ” असा सल्ला महिलांना दिला. यावेळी विद्यालयातील काही विद्यार्थिनींनी ही आपले मनोगत व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून बालवाडी विभाग व माध्यमिक विभाग माता पालकांचा सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थी सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे प्रायोजकत्व इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी यांनी केले. त्यावेळी उपस्थित असलेल्या माता पालक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना भेटवस्तू देऊन सन्मानित आले. बालवाडीतील मुलांना खाऊ दिला. तसेच विद्यालयातील चित्रकला शिक्षिका पल्लवी सिनकर यांनीही या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुलांना बक्षिसे दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनिषा वाघ मॅडम यांनी केले. प्रास्ताविक व परिचय सौ. मृदुल साने मॅडम यांनी केला तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर पालक सर्वांचे आभार सौ. अंजली सुमंत मॅडम यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page