“उडत्या पक्षाच्या पंखावर शेवाळ उगवते…”

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,राजधानी रायगडचे ऐतिहासिक वर्णन अतिशय बोलके व सूचक असून यातून खूप मोठा अर्थबोध आज होत आहे. कोकण हा प्रदेश मुलत: प्रचंड पावसाचा असल्याने या गोष्टी काही कोकण वासियांना नवीन नाहीत. तसेंच आज राजधानी रायगड वर झालेल्या पावसाची फार विशेष चर्चा सोशल मेडिया वर होत असल्याने यातील सत्य व तथ्य यावर थोडक्यात मांडणी येथे करण्यात येत आहे… १) काही मंडळी अशी मांडणी करीत आहेत की, सर्व ओढे महाद्वाराच्या बाजूने येत असल्याने येथे एवढा लोंढा स्वाभाविक आहे. मात्र मी सांगेन की, हा लोंढा शिवकाळात असा नव्हता, अनैतिहासिक कामे नव्याने झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. आज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळ्याआधी छताची शाकारणी व द्वारांना मेन लावीत होते त्यामुळे असे लोंढे येत असतील तर कोणतीही गोष्ट अशी टिकू शकत नाही. महाद्वार लावून घेतल्यावर जर असे पाणी आतील बाजूने साचले तर ते कितीही भक्कम द्वार फोडून बाहेर येणार हे स्वाभाविक आहे. २) प्रत्येक पावसाच्या आधी दुर्गावर लहान मोठी कामे केली जायची मात्र ती कामे आज रायगड प्राधीकरण किंवा केंद्रीय पुरातत्व विभाग मार्फत केली जात नाहीत. यात पाणी वाहून जाणाऱ्या मोऱ्यामध्ये गाळ, चिखल, दगडे अनेक वर्षे अडकून पडलेली आहेत. या मोऱ्या आधी मोकळ्या झाल्या की पाणी कितीही येवो ते बाहेर पडत राहते. ज्या वेळी रायगड बांधला गेला त्यावेळी मागील, तूर्त आणी भविष्याचा विचार करुन पाण्याचा निचरा होण्याच्या सोयी केल्या गेल्या होत्या. यातील अतिशय उत्तम संदर्भ द्यायचा असेल तर :- ज्यास समाज बाजारपेठ समजतो अशी रायगड वरील सैनिकांच्या राहत्या घरांची वास्तू ही सेक्शन ब्रेक केली गेली आहे. अर्थात त्या संपूर्ण समांतर बांधलेल्या दोन्ही रचनामधून पाणी वाहण्याची सोय व्हावी व सलग बांधलेली रचना तशी कमकुवतहोत् असते मात्र तीच दोन टप्प्यात बांधून त्या समांतर रेषेतील रचनेला देखील अतिशय भव्य आकाराच्या पाणी वाहून जाणाऱ्या पन्हाळ्या ठेवल्या गेल्या आहेत. या जेवढ्या भव्य ठेवल्या गेल्या आहेत तेवढ्या भव्य पन्हाळ क्वचितच कुठे इतस्थ आढळून येईल. तेव्हा पाण्याच्या प्रश्नावर खूप बारकाईने व धोरणात्मक विचार केला गेला होता हे येथे दिसून येते… ३) ज्या ठिकाणी तटबंदीला पाणी आतील बाजूने साचून राहिले गेले तेथे पाण्याच्या लोंढ्याने अतिशय भक्कम तटबंदी देखील पाण्यासोबत वाहून गेल्याचे कित्येक ठिकाणी निदर्शनास येते. एक संदर्भ द्यायचा तर :- विसापूर दुर्गावर दक्षिण बाजूची तटबंदी अशीच पाण्याच्या प्रवाही लोंढ्याने वाहूमेडीयानेअनेक दुर्गावर अशा घटना सातत्याने होत असतात. याकडे राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाचे खूप बारीक लक्ष असणे अभिप्रेत असते. रायगडावरील महाद्वाराच्या शेजारी पाणी जे धबधबा रूपाने खाली कोसळते आहे ते नेहमी अशाच स्वरूपात पावसाळ्यात पडत असते. ज्यांनी कुणी पावसाळ्यात सातत्याने या राजधानीवर भ्रमंती केली आहे त्यांना हे पुरते माहित आहे.प्रश्न उद्धभवला आहे आणी मेडीयाने डोक्यावर घेतला आहे तो म्हणजे पायऱ्यावरील अतिशय तीव्र वेगाने पडणारे व माणसे वाहून जातील एवढे पाणी याचा. त्याबद्दल अगदी सोपी बाब म्हणजे मागील गत काळात एकदा अवलोकन करून पहावे आणी ज्यावेळी पर्यटकांसाठी डाव्या दरीच्या बाजूने अलीकडे बांधलेली कुंपण भिंत नसतांनाचा रायगड आठवावा तेव्हा लक्षात येईल की, पाण्यास पर्यटकांच्या सोयीसाठी जो मार्ग आहे त्याचा अवरोध होत आहे. अर्थात पाण्याचा लोंढा या निमूळत्या बोळीतुन राहिल्याने त्यावरुन् चालणाऱ्या पर्यटकांच्या जीवाशीच हा खेळ होऊन बसला आहे. सारांश ढगफुटी, अतिशय तीव्र पाऊस वगैरे समस्या असूच शकत नाही. राजधानी रायगड जो हिरोजी इंदूळकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनी बांधला तो बेलाग व भक्कम आजतागायत आहेच मात्र अलिकडील पर्यटकांच्या सोयीसाठी केल्या गेलेल्या रचनेने व पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या पन्हाळ्यांत अडकल्याने मोऱ्यांचा श्वास गुदमरला असून पुढील काळात पावसाळ्याआधी करायच्या कामांची यादी तयार करावी तसेंच दुर्ग अभ्यासक / संशोधक व दुर्ग संवर्धक मंडळीच्या सूचना या यादी बनविण्यासाठी घेण्यात याव्यात. अर्थात आपल्या दुर्गांनी भारतीय संस्कृतीचे रक्षण केले आणी आता दुर्गांचे रक्षण / संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या नव्या पिढीच्या खांद्यावर आहे…

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page