कुमार रिसॉर्ट समोर असलेले पार्किंग जवळील शौचालय शेजारून व्ही पी एस शाळेत जाण्यासाठी जिना करावा – जितेंद्रभाई कल्याणजी









मावळ मराठा न्युज – लोणावळा,महावीर चौक(कुमार रिसॉर्ट) ते शेतकरी पुतळा येथे कायम आपले बारा महिने ट्राफिक असते आणि त्यात सकाळी साडेअकरा ते साडेबाराच्या दरम्यान खूप ट्राफिक होत असते ते ठिकाण म्हणजे शेतकरी पुतळा चौक. त्याचं कारण म्हणजे व्हीपीएस शाळा सुटल्यावर आणि शाळा भरल्यावर तिकडे विद्यार्थ्यांची नियमित गर्दी होत असते. त्यामुळे तिकडे खूप वाहतूककोंडी होत असते. त्यासाठी या गोष्टीकडे प्रशासन आणि शाळा समिती यांनी यावर विचार केला पाहिजे यातून काही मार्ग निघू शकतो. वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि विदयार्थ्यांना या गोष्टीचा सामना करायला लागू नये म्हणून एक उपाय योजना म्हणून लोणावळा नगरपालिका व व्ही पी एस शाळेच्या शाळा कमिटीने निर्णय घेऊन कुमार हॉटेल समोर असलेले जे आपलं पार्किंग आहे तेथून आधी खाली शाळेला जाण्यासाठी रस्ता होता तो रस्ता तिथून जर पुन्हा सुरु केला तर वाहन पार्किंगची देखील सोय होईल आणि विद्यार्थ्यांची देखील सोय होईल आणि शाळा सुटल्यावर आणि भरल्यावर कुणालाही वाहतूक कोंडीची अडचण होणार नाही.ज्या ठिकाणी शौचालय आहे त्याच्या शेजारून जिना केले तर शाळेत जायला यायला काही अडचण येणार नाही असे मत माजी शिक्षण मंडळ सभापती जितेंद्र भाई टेलर यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना व्यक्त केले.



