*राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते राष्ट्रपती भवन,येथे”ग्रंथ कुटीर”चे उद्घाटन; कैवल्यधाम योग संस्थेचे सुबोध तिवारी यांचा राष्ट्रपतींकडून सन्मान*








मावळ मराठा न्युज – दिल्ली -लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांचा राष्ट्रपतींकडून सन्मानभारताच्या सन्मानीय राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे “ग्रंथ कुटीर” चे उद्घाटन करण्यात आले.राष्ट्रपती भवन येथील ग्रंथ कुटीर मध्ये भारतातील विविध ग्रंथालायांकडून प्राचीन पाण्डुलिपीया देणगी स्वरूपात देण्यात आल्या होत्या. कैवल्यधाम योग संस्थेच्या प्राचीन सान्दीपनी ग्रंथालायातर्फे सुद्धा खालील तीन प्राचीन पाण्ड्रलिपीया देणगी स्वरुपात देण्यात आल्या यात १ . आश्वलायान्सूत्रावृन्ती वर्ष १८८४ २ . योगवसिष्ठसार वर्ष १८३५ ३ .कात्यायनसूत्रभाष्य वर्ष १८१६ या भाषांचा समावे्श आहे.त्यामुळे सन्मान म्हणून भारताच्या सन्मानीय राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांनी कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांना दिल्ली येथे आमंत्रित करून त्यांना “राष्ट्रपती भवन प्रतिमा” देऊन सन्मानित केले. या प्रसंगी देशातील विविध संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.सन्मानीय राष्ट्रपतींकडून मिळालेला हा सन्मान लोणावळेकरांसाठी अत्यंत गौरवशाली आणि अभिमानस्पद आहे.



