खालूम्बरे पवार वस्ती येथील गट नंबर १०८ च्या शेतकरींचा न्याय मिळत नाही म्हणून पोलिसांच्या विरोधात आत्महत्येचा इशारा

मावळ मराठा न्युज – खालूम्बरे,खालूम्बरे पोलिसांचा अजब कारभार,बिल्डरांना अतिक्रमण करून काम सुरु ठेवायची परवानगी द्यायची आणि शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रण करणाऱ्या बिल्डरचे तीन दिवस सुरु असलेले काम मात्र आम्ही थांबवू शकत नाही आणि तो आम्हाला अधिकार नाही अशी बिल्डर धार्जिनी भूमिका घेणाऱ्या खालूम्बरे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन गीते शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यायला तयार नाहीत. पोलिसांना बांधकाम थांबवण्याचा अधिकार नाही सांगणाऱ्या पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी पिढ्यानंपिढ्या मालक असणाऱ्या शेतकऱ्यांचा जागेवर तीन दिवस काम सुरु आहे त्याबाबत शेतकऱ्यांची बाजू सुद्धा ऐकून घेत नाहीत आणि एकीकडे बिल्डर ला संरक्षक भिंत बांधण्यासाठी आणि सलग तीन दिवस ते काम सुरु ठेवण्यासाठी पोलिसांचा पाठिंबा आहे असा आरोप शेतकरी यांनी मावळ मराठा न्युज कडे केला आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी यांनी आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आपली व्यथा पोलीस आयुक्त यांचे कडे मांडली आहे. त्याच बरोबर तशा प्रकारचे तर खेड तहसीलदार ज्योति देवरे यांच्याकडे देखील याबाबत दाद मागितली आहे. खालूम्बरे येथील गट नंबर १०८ च्या श्रीमती राधाबाई बापू पवार पोपट बापू पवार आणि पंडित बापू पवार यांच्या मालकीच्या १३ हेक्टर ४६ आर जमिनीवर हिस्सेदार हे जास्त असल्याने त्यांच्यात अद्याप वाटप झाले नाही परंतु सदर हिस्सेदारांपैकी काही हिस्सेदारांनी त्यांचे हिस्याची जमीन काही लोकांना खरेदी दिलेली आहे. यात ७/१२ सदरी मालक असलेल्या लोकांची परवानगी अथवा संमती नसताना भूमि अभिलेख राजगुरूनगर यांचेकडे खोट्या सह्या आणि खातेदार मयत झाले असताना खोटी माणसे उभे करून खोटी फाळणीबारास अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली यात खेड मधील कोणाच्या राजकीय आशीर्वादाने मुळ शेतकऱ्यांच्या जमीनीवर खालूम्बरे पोलीस स्टेशनच्या मदतीने गुंडाकरवी ताबा घेण्याचे काम सुरु आहे या मागे कोणता बडा नेता आहे जनतेला हे चांगलेच माहित आहे. पिढ्यानपिढ्या ताबा आणि मालकी असणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस आणि महसूल प्रशासन न्याय देत नसेल तर आम्ही काय आत्महत्या करायची का असा उदीग्न सवाल शेतकरी यांचा आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page