सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नेत्र चिकित्सा,दंत चिकित्सा, मधुमेह, रक्तदाब, मुतखडा, कंबरदुखी,हाडांचे ठिसुळता,ऑक्सिजन पातळी आरोग्य शिबिर संपन्न

मावळ मराठा न्युज :-किवळे,सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ ,आदर्श नगर, किवळे या ठिकाणी नुकतेच मोफत जेष्ट नागरिकासाठी आरोग्य  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने नेत्र चिकित्सा,दंत चिकित्सा, मधुमेह, रक्तदाब, मुतखडा, कंबरदुखी,हाडांचे ठिसुळता,ऑक्सिजन पातळी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. स्त्रियांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून विशेष तपासणी व मोफत सल्ला देण्यात आला.या शिबीरात सुमारे 200 जेष्ट नागरिकांनी  आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. यावेळी  संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे म्हणाले की आमच्या संघामध्ये जेष्ठांच्या कलागुणांना वाव देऊन मनोरंजन साठी विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येतात.उपाध्यक्ष साहेबराव देसले म्हणाले की संघाच्या कार्यक्रमात सर्वजण कुटुंबासह सहभागी होत असतात वयाचा विचार न करता आम्ही सर्वजण आनंदी राहण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो .सचिव रमेश थोरात म्हणाले की आमच्या संघाच्या वतीने सहलीचे आयोजन करून आपल्या संघातील जेष्ट नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व त्यांना आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला काय देता येईल याचाच विचार संघ नेहमी विचार करत असतो.खजिनदार प्रकाश सावंत म्हणाले की आरोग्य शिबिरामध्ये संघ व आमचे कौटुंबिक नाते आहे,जातीभेद न करता आम्ही सर्वजण एकमेकांच्या सुखा दुःखात सहभागी होत आसतो.संघाच्या वतीने अधिकाधिक नागरिकांना  आरोग्य विषयक काय सुविधा कशा देता येतील व  त्यांना निरोगी कसे ठेवता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असतो.आमच्या संघाचे सभासद दोन वर्षात दुप्पटीने वाढलेले आहे.कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आण्णा जोगदंड म्हणाले की कमी वेळात जास्तीत जास्त सभासद या संघाने करून घेतले आहेत प्रशस्त सर्व सुखसोयींनीयुक्त प्रशस्त व्हाल असून  पिंपरी चिंचवड शहरातील 152 संघापैकी सोमेश्वर जेष्ठ नागरिक संघ नावाप्रमाणेच आदर्शनगर मधील खरोखरच आदर्श असा ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून ओळखला जातो आणि त्यांचे कौतुकही करावेसे  तेवढे कमीच आहे, आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे आणि ते आपण दिले पाहिजे या उदात्त्य भावणेतून हा संघ काम करीत असल्याचे गौरवउद्गगार अण्णा जोगदंड यांनी यावेळी काढले.यावेळी सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. सुदाम दिवटे, उपाध्यक्ष श्री. साहेबराव देसले,प्रमुख पाहुणे आण्णा जोगदंड यांनी शिबीराचे उद्घाटन केले.यावेळी अध्यक्ष सुदाम दिवटे, उपाध्यक्ष साहेबराव देसले, खजिनदार श्री.प्रकाश सावंत, सचिव श्री.रमेश थोरात, संचालक श्री.तुकाराम कोरडे, श्री.बाबासाहेब मोहिते,सौ.रंजना सस्ते, श्री.रविंद्र मुळबागल, श्री.भिमाशंकर जाधव, गुणवंत कामगार रविंद्र कदम श्री.राजेंद्र मोरे,श्री.निवृती आवटे,सौ.शशिकला दास,छायादेवी निकम यांनी शिबीर पुर्णत्वासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व विविध दालनांची माहिती श्री.सुरेश बडगुजर यांनी दिली. श्री.किशोर गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page