*स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने कुसगाव जिल्हा परिषद शाळेत रोटरी क्लब ऑफ लोणावळा तर्फे ‘आकार’ प्रकल्प सुरू*








मावळ मराठा न्युज -कुसगाव, दि. १५ ऑगस्ट २०२६,स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कुसगाव जिल्हा परिषद शाळेत रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या वतीने ‘आकार – Pottery & Skill Development Centre’ या अभिनव कौशल्य विकास प्रकल्पाची सुरुवातकरण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कार्यानुभव, सर्जनशीलता आणि व्यावहारिक कौशल्ये मिळावीत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.‘आकार’ प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना मातीपासून पणत्या, पॉट्स तसेच विविध उपयोगी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा प्रशिक्षण वर्ग दर शनिवारी शाळेत घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच भविष्यात त्यांच्या कौशल्याचे उत्पादन व उत्पन्ननिर्मितीच्या संधींमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे.या उपक्रमाची संकल्पना कुसगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. महादेव शेलार सर यांच्या पुढाकारातून साकारली असून, रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या सहकार्याने आणि ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या वतीने प्रथमच अशा प्रकारचे Skill Development Centre सुरू करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर गायन व नृत्याचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.यावेळी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना १० सायकलींचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच कुसगाव जिल्हा परिषद शाळेत प्रथमच टेनिस कोर्टची स्थापना करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातही नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.कार्यक्रमास माननीय जिल्हा परिषद सदस्य श्री. राऊत साहेब, कुसगाव ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी रोटरी क्लब ऑफ लोणावळ्याच्या अध्यक्षा रो. ॲड. मोनाली कुलकर्णी-शेलार, IPP रो. विजया कल्याण, तसेच रो. आशिष मेहता, रो. नारायण शरवाले, रो. जयवंत नलोडे, रो. रवींद्र कुलकर्णी, रो. दिलीप पवार, रो. नितीन कल्याण, श्वेता देशमुख, ॲड. दिनेश शेलार आणि पूनम कदम यांच्यासह रोटरी सदस्य उपस्थित होते.“मुलांच्या हातांना कौशल्य, कल्पनाशक्तीला आकार आणि भविष्यासाठी आत्मविश्वास देणे” हा ‘आकार’ प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून, रोटरीच्या “Create Lasting Impact”या यावर्षीच्या संकल्पनेशी हा उपक्रम सुसंगत आहे. शिक्षण, कौशल्य, क्रीडा आणि स्वावलंबन या चारही क्षेत्रांना एकत्रितपणे चालना देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लब ऑफ लोणावळा सातत्याने कार्यरत राहणार आहे.



