राष्ट्रवादीशी कोणतीही युती नाही,अफ़वा निर्णय घेण्यास आम्ही सक्षम,आमदार शेळके यांनी मतदा्रांमध्ये अफ़वा पसरू नये -सुरेखा जाधव







मावळ मराठा न्युज -लोणावळा नगरपरिषद निवडणुकीची रण धुमाळी सुरु झाली असून आज मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव येथे पत्रकार परिषद घेतली त्यात मुंबईला जाऊन तळेगाव ला भाजप आणि लोणावळा ला राष्ट्रवादी असा निर्णय वरिष्ठां कडून झाला असल्याचे जाहीर केले आणि लोणावळ्याला इकडे लगेच माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी लोणावळाचा निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात लुडबुड करू नये असे ठणकावले.तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा,आमच्या पक्षाचे आम्ही बघायला सक्षम आहोत लोणावळ्याचा विकास आणि लोणावळेकर नागरिकांचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे लोणावळ्यात राष्ट्रवादी आणि भाजपची कोणतीही युती झालेली नाही.विनाकारण मतदारमध्ये सभ्रम पसरवण्याचे काम आमदार सुनील शेळके यांनी करू नये असा स्पष्ट शब्दात सुरेखा जाधव यांनी आमदार शेळके यांच्या समाचार घेतला. आम्ही एकदा भाजपच्या उमेदवारी जाहीर केली आहे त्यांना कोणी माघार घेण्यासाठी धमकावण्यचे प्रयत्न करू नये.असेही जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.भारतीय जनता पक्ष,नाणे मावळ लोणावळा मंडळ,यांच्या वतीनं आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज दि. १२ नोव्हेंबर रोजी सुमित्रा हॉल,भांगरवाडी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष अनिल गायकवाड,सुरेखा जाधव,श्रीधर पुजारी,राजाभाऊ खलदकर,बिंद्रा गणात्रा,अमित गवळी,विजय मोरे,सुभाष डेनकर,महिला अध्यक्षा भिल्लारे आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



