तळेगाव जनरल हॉस्पिटलचे जनक डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाईंचा स्मृतिदिन गीतेतील पंधराव्या अध्याय पठणाने संपन्न

मावळ मराठा न्यूज़:- तळेगाव ,सर्वप्रथम तळेगाव जनरल हॉस्पिटल संचलित नर्सिंग स्कूलचे पालक डॉक्टर शालिग्राम भंडारींनी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व उपस्थित निमंत्रितांच मनःपूर्वक स्वागत केलं! १७ मार्च 1883 रोजी जन्मलेल्या डॉक्टर भाऊसाहेबांनी इंग्लंडहून नेत्र रुग्ण चिकित्सक अत्यंत उच्च पदवी संपादन करून तळेगाव येथे १९२५ यावर्षी केवळ पाच बेड असलेल्या तळेगाव जनरल हॉस्पिटल ची स्थापना केली. नेत्र विभागाने सुरू झालेले हे हॉस्पिटल काळाची गरज म्हणून टी बी सेनेटोरियम- मेडिसिन- सर्जरी आणि गायनॅक अशा विविध विभागाने रुग्णसेवेसाठी सज्ज झाले.१४ ऑक्टोबर १९७३ या दिवशी डॉक्टर भाऊसाहेबांनी आपल्या इहलोकीची यात्रा संपविली. तळेगाव जनरल हॉस्पिटलची शताब्दीकडे वाटचाल सुरू असताना नर्सिंग स्कूलमध्ये शिकत असणारा विद्यार्थी हा किती भाग्यवान आहे हे डॉक्टर भंडारींनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना विशद केले. पुढे जाऊन- डॉक्टर भाऊसाहेब हे खरोखरच पुरुषोत्तम होते आणि हेच त्यांच्या जीवन प्रवासाच औचित्य साधून दरवर्षी गीतेतील पंधराव्या अध्यायाचे पठण आपण विद्यार्थ्यांसमोर सादर करतो. असे डॉ.भंडारी यांनी सांगितले .संस्थेचे तरुण तडफदार अत्यंत अभ्यासू अध्यक्ष गणेश खांडगे यांनी पत्रकारांना मुलाखत देताना जनरल हॉस्पिटलच्या ९८ वर्षाच्या उज्वल प्रवासाचा आलेखच मांडला . केवळ पाच खटांवर सुरू झालेला हा वैद्यकीय सेवेचा प्रवास अत्यंत आधुनिक अशा वैद्यकीय सेवेने युक्त असलेल्या ५०० बेड पर्यंत यशस्वीपणे पोहोचलेला आहे. एवढेच नव्हे तर टी जी एच-लाइफ या शीर्षकाखाली अत्यंत अत्याधुनिक साधनांनी युक्त असे कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख आपल्या मुलाखतीत केला. या प्रवासात मार्गदर्शक माजी आमदार कृष्णरावजी भेगडे डॉक्टर,अशोक निकम, बाळासाहेब किबे ,श्री रामदास आप्पा काकडे,उपाध्यक्ष डॉक्टर दीपकभाई शहा, सभापती शैलेश भाई शहा याबरोबरच डॉक्टर सुभाष खंडकर, डॉक्टर दिलीप भोगे, डॉक्टर संजीव कडलस्कर अशा अगणित मान्यवरांचाही सिंहाचा वाटा आहे असा नम्रपणे उल्लेख अध्यक्षांनी पुढे आपल्या मुलाखतीत व्यक्त केला .यानंतर स्वर्गीय डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाईच्या परिवारातील सर्व सन्माननीय सदस्यांनी भाऊसाहेबांच्या समाधीवर पुष्प समर्पित करून आदरांजली वाहिली.संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश खांडगे यांच्याबरोबरच संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार कृष्णाजी भेगडे, उपाध्यक्ष डॉक्टर दीपकभाई शहा, सभापती श्री शैलेश शहा, चिटणीस डॉक्टर सत्यजित वाढोकर,खजिनदार श्री विनायक अभ्यंकर, सदस्य श्री हेमंत सरदेसाई,श्री नितीन सरदेसाई ,श्री सुकेंदू कुलकर्णी, श्री दिलीपभाई शहा आणि पालकमंत्री डॉक्टर शाळीग्राम भंडारी या नियामक मंडळातील सदस्यांनी समाधीवर पुष्पाअर्पण करून आपली आदरांजली समर्पित केली. त्यानंतर संस्थेची वार्षिक सभा संपन्न झाली . सिद्धीका सोनवणे आणि सानिका पवार यांनी गीतेतील पंधराव्या अध्यायाचं पठण केलं,नर्सिंग स्कूलच्या प्रिन्सिपल मोनालिसा पारगे मॅडम,ज्येष्ठ ट्यूटर युक्ता नलवडे, व्यवस्थापनाकडून संगीता निसवडे आणि गार्गी मेहता मॅडम, ध्वनी योजना- प्रथमेश सोनवणे फोटोग्राफी, परमेश्वर राठोड या सर्वांनी विशेष परिश्रम घेतलेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page