*कामगार कल्याण मंडळाच्या पिंपरीच्या वतीने ८० वा १५ अॉगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*








मावळ मराठा न्युज-दि.१५ अॉगस्ट २०२६स्वातंत्र्यदिनाचे अवचित्त साधून लहान मुलांना खाऊ वाटप करून रँली काढून साजरा तसेच पैलवान काळुराम लांडगे यांना महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी पद मिळाल्यामुळे त्यांचा मान्यवर पाहुणे जेष्ठ साहित्यिक व पत्रकार श्री.शिवाजीराव शिर्के , मानवी हक्क सरंक्षण जागृती पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष श्री.आण्णा जोगदंड यांच्या शुभहस्ते शाल , नारळ , गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले.संततुकाराम नगर येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सुदाम शिंदे,अण्णा जोगदंड,शिवाजीराव शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले .ध्वजारोहण प्रसंगी सुदाम शिंदे म्हणाले की कोणता इतिहास सांगायचा नसतो तो घडवायचा असतो तिरंगा ध्वजाचा मान राखून, स्वतंत्र सैनिक, वीर हुतात्मे यांच्या भावनेचा व कार्याचा आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे.अण्णा जोगदंड म्हणाले की गुणवंत कामगारांनी पुरस्कार मिळाल्यानंतरही सामाजिक काम चालू ठेवण्याचे आवाहन केले, तरुणाई मोबाईल, टिव्हीच्या विळख्यात अडकली आहे त्यामध्ये वाचन संस्कृती रूजवण्याचे काम करावे गुणवंत कामगारांने करावे असा सल्लाही जोगदंड यांनी दिला.ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के म्हणाले की मी खूप भाग्यवान आहे की देशाचा पहिला स्वतंत्र दिन साजरा करण्याचे भाग्य मला मिळाले आणि माझ्या उघड्या डोळ्यांनी पहिला स्वतंत्र दिन बघितला. गुणवंत कामगारांनी मिळेल त्या वेळेत लिखाण वाढवले पाहिजे माझ्या येसूबाई या पुस्तकाची नोंद इंडिया बुक मध्ये झाली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.अण्णा जोगदंड यांनी”कावळा म्हणतो’ काव काव एक तरी झाड लाव” असे म्हणत की प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक तरी झाड लावावे व जगवावे अशी शपथ दिली. जेष्ट साहित्यिक शामराव सरकाळे आणि प्रकाश घोरपडे यांनी देशभक्तीपर गिते सादर केली.मंडळाच्या वतीने शिवण क्लासेसची परीक्षा घेण्यात आली होती उत्तीर्ण विद्यार्थ्यांना व महिलांना प्रमाणपत्रही देण्यात आली.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी केंद्र संचालक अनिल कारळें , केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे , महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे उपअधीक्षक प्रवीण सावंत , सामाजिक कार्यकर्ते किरण कोळेकर ,गुणवंत कामगार संगीता जोगदंड , ह. भ. प. शामराव गायकवाड, कामगारनेते श्री.किरण देशमुख , लक्ष्मण शिंदे, किरण हेळकर,शैलेजा आवडे,संगिता क्षीरसागर,सह अनेक कामगार उपस्थित होते.केंद्र संचालक आनिल कारळे यांनी सुत्रसंचालन केले तर उपसंचालिका सुरेखा मोरे यांनी आभार मानले.



