लोणावळ्यात श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ येथे सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात राखी थाली डेकोरेशन व राजस्थानी पेहराव स्पर्धांचे आयोजन

मावळ मराठा न्युज -लोणावळा,श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ या ठिकाणी परमपूज्य सिद्धी सुधाजी महाराज साब आदि थाना ३ च्या चातुर्मास मध्ये गुरु महाराजांच्या प्रेरणेने सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. या विशेष सोहळ्यात राखी थाली डेकोरेशन व राजस्थानी पेहराव अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जैन स्थानक या ठिकाणी जैन समुदायातील आपल्या बहिण भावंडांचा हा एकत्रित कार्यक्रम जणू काही सगळ्यांनाच आत्यानंद देऊन गेला. रक्षाबंधन यावर गुरु महाराजांनी खूप सुंदर व्याख्यान दिले. आपल्या पूर्वापार परंपरेतून अगदी रामायण महाभारताच्या काळापासून बहिण भावाच्या या सणांचा सुंदर असा इतिहास गुरू महाराजांनी खूप सुंदर रित्या उलगडला. हा इतिहास ऐकताना संपूर्ण समाज भाऊक झाला. सदर कार्यक्रमांमध्ये थाली डेकोरेशन मध्ये प्रथम क्रमांक सौ ऋषिका कांकरिया यांनी पटकावला तर दुसऱ्या क्रमांक सौ प्रेक्षा लुंकड यांना मिळाला. उत्तम वेशभूषा मध्ये श्री संतोष चोरडिया आणि त्यांच्या भगिनी यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. लकी ड्रॉ मध्ये सौ अनुराधा चोरडिया, सौ निर्मला ललवानी यांना बक्षीस मिळाले. तसेच सौ प्रियंका पारख आणि श्री राजू संकला यांनाही बक्षीसे देण्यात आली. सर्व स्पर्धकांना बक्षीसे श्रावक संघाचे अध्यक्ष श्री गिरीशजी महेंद्रजी पारख व आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ संगीता भुरट व संघातील ज्येष्ठ व्यक्तींच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमानंतर सगळ्यांना नवकारशी (अल्पोपहार)चा लाभ श्रीमती कांताबाई चंपालालजी नाहर परिवार यांच्यातर्फे ठेवण्यात आला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page