लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज च्या वतीने ऑक्टोबर ‘सर्व्हिस वीक’ निमित्त ‘महात्मा गांधीजींवर आधारित कथाकथन स्पर्धा’

मावळ मराठा न्युज – लोणावळा,ऑक्टोबर ‘सर्व्हिस वीक’ (सेवा सप्ताह) अंतर्गत पहिला उपक्रम म्हणून, ‘माय फर्स्ट स्टेप स्कूल’मध्ये इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘महात्मा गांधीजींवर आधारित कथाकथन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका लायन मुनिरा रामपूरवाला यांनी लायन सुरैया आणि अमीन वाडीवाला यांना प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून आमंत्रित केले होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना एकूण ८ बक्षिसे देण्यात आली आणि ही सर्व बक्षिसे लायन सुरैया वाडीवाला यांनी प्रायोजित केली होती. या लहान मुलांना सेवा करण्याची आणि त्यांना प्रोत्साहित करण्याची संधी दिल्याबद्दल मुख्याध्यापिका लायन मुनिरा मॅडम यांचे लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज कडून आभार मानण्यात आले. ‘टीम लोणावळा सुप्रेमोज’ शालेय विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित कोणत्याही उपक्रमासाठी सदैव तत्पर असते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page