लायन्स क्लब ऑफ लोणावळा तर्फे दत्तवाडी,कुसगाव बुll येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिर

दत्त जयंती निमित्त आरोग्य शिबीर

मावळ मराठा न्यूज – लोणावळा,दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी लायन्स क्लब ऑफ लोणावळा तर्फे दत्तवाडी,कुसगाव बुll येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले. त्याच ठिकाणी एस् व्हीएसी या संस्थेमार्फत मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. गरजूंना मोफत चष्मेवाटप करण्यात आले. यात १६० लाभार्थींची तपासणी करण्यात आली. यासाठी डॉ श्रुती (नेत्रतज्ज्ञ), अध्यक्ष लायन साधना टाटीया, सचिव लायन सारीका अगरवाल, लायन श्रुती शहा, लायन डॉ सीमा शिंदे, परिचारिका विद्या शिंदे व किर्ती हळूंदे उपस्थित होते. दत्तजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी अध्यक्ष वैभव वायकर, संतोष शिर्के,बंडू येवले,भरत ठाकर,मयूर जगदाळे, रमेश कडू, जयराम भोसले, ओम मालपोटे,जितेंद्र जगदाळे,राजेश शिर्के व नवनाथ मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्या’नी विशेष परिश्रम घेतले. नेत्रतपासणीसाठी एस् व्हीएसी चे डॉ आबासाहेब गडदे, श्री शर्मा यांचे तर चष्म्यांसाठी लायन साधना टाटीया, औषधांसाठी लायन डॉ सीमा शिंदे यांचे सौजन्य लाभले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page