मॅफेड्रॉन (MD) विक्रीसाठी आलेल्या ४ इसमांवर लोणावळा शहर पोलीसांकडून धडक कारवाई






मावळ मराठा न्युज – लोणावळा, दि.०४/१०/२०२६ रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस असणारे पोसई संदेश चंदनशिव व पोशि/८१३ राहुल चोरगे यांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, मौजे लोणावळा तुंगार्ली गावाचे हद्दीत लगुना रिसॉर्टच्या समोरील मोकळ्या जागेत अंदाजे ५ फुट ४ इंच उंची असलेला इसम नामे मयुर निवुत्ती गोणते रा. ओळकाईवाडी कुसगाव ता. मावळ जि.पुणे व त्याचे साथीदार नामे १) दिनेश शशिकांत दळवी रा. ओळकाईवाडी कुसगाव ता. मावळ जि.पुणे २) मंगेश रमेश लोखंडे रा. ओळकाईवाडी कुसगाव ता. मावळ जि. पुणे ३) दत्ता संजय बेदरकर रा. स्वराज्य नगरी बारा बंगला लोणावळा ता.मावळ जि.पुणे अंमली पदार्थ विक्रीसाठी व सेवन करण्यासाठी मारुती स्विफ्ट कार क्र. MH14BC9631 मध्ये येणार आहेत अशी बातमी मिळताच सदर घटनास्थळी दाखल होवुन सदर आरोपीतांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीतांकडुन एकुण ५ ग्रॅम मॅफेड्रॉन (MD) जप्त करण्यात आले आहे.श्री. संदिपसिंह गिल सो पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण, श्री शुभम कुमार सो अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, श्री गजानन टोम्पे उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा उपविभाग, श्री सचिन पाटील सो पोलीस निरीक्षक लोणावळा शहर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असुन नमुद कारवाई मध्ये लोणावळा शहर पोलीस ठाणेचे पोसई संदेश चंदनशिव, पोहवा/मयुर अबनावे, पोहवा/शशिकांत खोपडे, पोहवा/विष्णु फटांगडे, पोशि/धनंजय आगवणे, पोशि/राहुल चोरगे, पोशि/अंकुश पाटील, पोशि/स्वप्निल पाटील, पोशि/निलेश सोनवणे, पोशि/तुषार शिंदे हे होते. लोणावळा खंडाळा परिसरात येणा-या सर्व पर्यटकांना लोणावळा शहर पोलीस ठाणे कडुन आवाहन करण्यात येते की, कोणत्याही प्रकारचे मॅफेड्रॉन (MD) चे सेवन करु नये अथवा कोणी विक्री करत असल्याचे समजताच तात्काळ ११२ क्रमांकावर किंवा लोणावळा शहर पोलीस ठाणेस संपर्क करावा असे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे.



