शिक्षकांनी उपक्रमशीलतेतून गुणवत्ता जपा- गोविंद नांदेडे







मावळ मराठा न्युज – मुंबई,कल्याणम् एज्यूकेअर पुणे तर्फे आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा ०२/१०/२०२६ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ आझाद मैदान मुंबई येथील सभागृहात पार पडला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुंबई महानगर पालिका उपमहापौर श्री संजय घाडी साहेब, प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्याचे माजी शिक्षण संचालक श्री गोविंद नांदेडे साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून मीरा भाईंदर महापालिकेच्या माजी महापौर श्रीमती निर्मलाताई सावळे तर शिक्षण प्रेमी महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर श्री साहेबराव सुरवसे साहेब ज्येष्ठ शिक्षक श्री शिवाजीराव कांडेकर सर सिनेअभिनेत्री दिव्यांशी डे यांची विशेष उपस्थिती होती श्री संजय घाडी यांनी भ्रमण ध्वनीवरून शुभेछ्या दिल्या तर इतर मान्यवरांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील 75 उपक्रमशील आदर्श शिक्षक शिक्षकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड कल्याण नेहरकर यांनी केले तर सूत्र संचालन श्री सुभाषराव पाटील यांनी केले . कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री संपत मुरकुटे, श्री सवदे सर श्री बंडू आघाव सर, श्री भगवान नेहरकर यांनी नियोजन केले.



