इंद्रायणी नदीतील प्रदूषणासाठी लोणावळा नगरपरिषदेसह पाच मुख्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा,सर्व पक्षीयांनी एकत्रित येऊन आंदोलनाची गरज



मावळ मराठा न्युज :-लोणावळा, लोणावळ्यात इंद्रायणी नदीचे उगम स्थान असताना नदीचे आणि वारकरी संप्रदायचे पावित्र्य राखण्यास आणि त्यातील प्रदूषणाला लोणावळा नगरपरिषदेसह इतर,चार नगरपालिकाना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जबाबदार धरले आहे. इंद्रायणी नदीतील प्रदूषणासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आळंदीसह पाच नगरपालिका, दोन नगरपंचायती व एका कटक मंडळाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जबाबदार धरले आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या सर्व संस्थांच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.गेली दोन वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्यावर निवडणुका झाल्या नसल्याने प्रशासन लोकप्रतिनिधी सारखे याकडे लक्ष देताना दिसत नाहीत. लोकप्रतिनिधीना निदान जाब तरी विचारता येतो परंतु गेंड्याच्या कातडीचे पालिका प्रशासन मात्र आपल्या धुंदीत च काम करते आहे.त्यांना अश्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला स्वारस्य दिसत नाही.
नोटिसा बजावण्यात आलेल्यांमध्ये आळंदी, लोणावळा, तळेगाव दाभाडे या तीन नगर परिषदा, देहू आणि देहू गाव आणि वडगाव या दोन नगरपंचायती आणि देहू रोड हे कटक मंडळ, अशा एकूण सहा संस्थांच्या मुख्याधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व मुख्याधिकाऱ्यांना पाण्याच्या गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी पुरेसे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प म्हणजे एसटीपी कार्यान्वित करण्यास आणि सांडपाणी वाहिन्यांचे जाळे उभारण्याचा आदेश देण्यात आला आहे.यासाठी लोणावळ्यात सर्वपक्षांनी लेखी निवेदने तर दिली परंतु गेंड्याच्या कातडीच्या लोणावळा नगरपरिषद प्रशासनाला आंदोलन करून सर्वांनी जाब विचारला पाहिजे.वारीच्या काळात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदीचे प्रदूषण
रोखण्यासाठी इंद्रायणी नदी, एसटीपी आणि उद्योगांचे २४ तास निरीक्षण सुरू केले आहे. मुंबईतील ‘एमपीसीबी’ मुख्यालयाच्या सूचनांच्या माध्यमातून पुण्यातील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी इंद्रायणी नदी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि संबंधित उद्योगांची २४ तास देखरेख आणि नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. आषाढी वारी दरम्यान इंद्रायणी नदीचे पर्यावरणीय आरोग्य जतन करण्यासाठी आणि प्रदूषणमुक्त वातावरण निश्चित करण्यासाठी ‘एमपीसीबी’ कटिबद्ध आहे. या उपाययोजनांचा उद्देश हा नैसर्गिक अधिवास, आरोग्य आणि यात्रेकरू व रहिवासी या दोन्हींचे संरक्षण करणे हा असल्याचे या मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पत्रकारांना सांगितले.




