गेंड्याच्या कातडीचे शासन पक्षांतर नि पक्षप्रवेश मध्ये व्यस्त,अधिवेशन लांबणीवर,सकल मराठा समाजात प्रचंड संताप

मावळ मराठा न्युज :-लोणावळा, मराठा आरक्षण कायदा व्हावा यासाठी १० फेब्रुवारी रोजी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती ढासळली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज चे ग्रामीण भागातील योद्धे भाऊसाहेब हुलावळे, कैलास पडवळ संत तुकाराम महाराज झाड, वाकसई येथे १० तारखेपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांचा उपोषणाचा आज ५ वा दिवस आहे. त्यांनी देखील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सारखाच प्रकृती तपासणीला विरोध केल्याने आणि प्रकृती ढासळत असल्याने सकल मराठा समाजाची चिंता वाढली आहे. नुकतीच त्यांची मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख लोणावळाग्रामीण चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी उपोषणकर्त्यांची तब्बेतची विचारपूस केली. अधिसूचनेचे रूपांतर कायद्यात करावे या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला. बंदला लोणावळा शहर आणि ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात वेहेरगाव, मळवली कार्ला भागात भागात दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली.मराठा समाजात आरक्षण संदर्भात जनजागृतीसाठी लोणावळा ते वडगाव, तळेगाव दरम्यान दुचाकी रॅली काढण्यात आली त्याला उत्सु्फूर्त पाठिंबा मिळाला. गेंड्याच्या कातडीचे शासन आपल्या पक्षांतर आणि पक्ष प्रवेश मध्ये व्यस्त असल्याने सकल मराठा समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page