संस्कृत भारती संस्थेतर्फे पुणे ग्रामीण भागाचा “भाषाबोधनः दिनद्वयात्मकः वर्गः ” संपन्न!

मावळ मराठा न्युज:-तळेगाव,शनिवारी दि. १९/१०/२४ रोजी या वर्गाची सांगता झाली. मुंबई पुणे रस्त्यावरील ‘भंडारी व्हिला’ येथील निसर्गरम्य, प्रसन्न वातावरणात दीप प्रज्वलन, प्रार्थना व गीत गायनाने सकाळच्या सत्राची सुरवात झाली! – सौ मंजुषा तेलंग, विशेष्य,विषेशण – सौ.सोनल जोशी, विभक्ती – श्री अमेय जोशी, संख्या अभ्यास-सौ ज्योती मुंगी, ह्या व्यासंगी, अनुभवी शिक्षकांनी उत्तम व सुलभ पध्दतीने हे सर्व विषय शिकवलेत. मध्याह्नाला डाॅ. शाळीग्राम भंडारी ह्यांनी उपस्थितांना संस्कृत संभाषण कलेविषयीचे बोधक मार्गदर्शन केले! स्वरूची रुचकर भोजनानंतर दुपारचे सत्र झाले. सकाळी शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी आणि गट चर्चा सुद्धा या वर्गात झाली . दुपारच्या चहापानानंतर संध्याकाळी ५ वा. वर्गाची सांगता झाली. संस्कृत शिक्षण्यात रुची असणाऱ्या विदयार्थ्यांनी ह्या वर्गात सहभाग घेतला. गीत गायन व कार्यक्रमाचे आयोजन सौ.वसुधा साठे, श्री. अमेय जोशी आणि सौ. सोनल जोशी ह्यांनी केले. डाॅ. शाळीग्राम भंडारी ह्यांनी आपली वास्तु विनाशुल्क उपलब्ध करुन दिली तसेच वर्ग यशस्वी होण्यास सर्वतोपरी सहकार्य केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page