लोणावळा शहरात सामाजिक सद्भाव कार्याची सद्भाव बैठक उत्साहात

मावळ मराठा न्युज -लोणावळा,दिनांक २६ ऑगस्ट २०२६, बुधवार सामाजिक सद्भाव संयोजक श्री.ओमप्रकाश अशोक जाधव, लोणावळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सद्भाव बैठक उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाली. विविध ज्ञाती संस्थांमधील प्रतिनिधी तसेच नागरिकांचा या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २२ ज्ञाती संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात चहा व नोंदणीने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन व भारतमाता पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवर व सहभागींचे गुलाबपुष्प तसेच दोन पुस्तकांची भेट देऊन स्वागत करण्यात आले.यानंतर श्री.अविनाशजी भेगडे, पुणे विभाग कार्यवाह यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात सामाजिक सद्भावाच्या कार्याचे महत्त्व व त्याची आवश्यकता अधोरेखित केली. त्यानंतर डॉ.पंकज जयस्वाल यांनी पंचपरिवर्तन या विषयाची माहिती उपस्थितांसमोर मांडली. यामध्ये पर्यावरण, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, स्व-बोध आणि नागरिक कर्तव्य या पाच विषयांचा समावेश असून, या क्षेत्रात आतापर्यंत झालेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच भविष्यात या विषयांवर समाजाच्या सहभागातून कोणकोणते उपक्रम राबविता येतील, याबाबत उपस्थितांच्या सहभागाने चर्चासत्र घेण्यात आले.यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आभार प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिकरित्या पसायदान म्हटले. सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.सामाजिक सद्भाव, आपुलकी, बंधुभाव आणि परस्पर संवाद वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने ही बैठक उपयुक्त ठरली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page